Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे आषाढी एकादशी साजरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहर रिक्षा असोसिएशनतर्फे रिक्षा स्टँडवर प्रथमच श्री विठ्ठल-मुर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. वारकरी परंपरेचे जतन करणारे रिक्षा असोसिएशनमधील वारकरी रिक्षाचालक सुरेश खाडे, प्रविण पोवार आणि अशोक मोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर सर्व उपस्थीत रिक्षा चालक बांधव भक्तिभावाने विठ्ठलाची आरती म्हणत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!” या नामघोषाने रिक्षा स्टँडचे वातावरण पंढरपूरच्या वारीची अनुभूती देत होते. विठ्ठलभक्तांना शाबू खिचडी आणि केळीचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळीरिक्षा असोसिएशनचे आधारस्तंभ बाळासाहेब जासूद, अध्यक्ष सुंदर खराडे, उपाध्यक्ष कलगौंडा शिरहट्टी, प्रवीण पोवार यांच्यासह संचालक व रिक्षाचालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *