Sunday , September 20 2026
Breaking News

श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांची नगरपालिकेत गांभीर्याने पुण्यतिथी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका नगरपालिकेतर्फे निपाणी संस्थांचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे -निपाणकर यांची पुण्यतिथी गांभीर्याने झाली. प्रारंभी निपाणी नगरपालिकेतील अभियंते विवेक जोशी यांनी निपाणकर राजघराण्याचे विद्यमान राजसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर, विजयराजे निपाणकर यांचे स्वागत केले.
त्यानंतर श्री. विवेक जोशी यांच्या शुभहस्ते श्रीमंत सिद्धूजीराजे निपाणकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सभागृहामध्ये असलेले प्रतिमेचे पूजन श्रीमंत दादाराजे निपाणकर व विजयराजे निपाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिले. अभियंते जोशी म्हणाले, श्रीमंत निपाणकर सरकार यांनी हे शहर वसविले आहे. याशिवाय नगरीमध्ये विविध योजना नागरिकांच्यासाठी आणून ही नगरी सजलाम सुफलाम करून केल्याचे सांगितले. पालिका अकाउंट सुपरहिट नागेंद्र बहादुरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुनील कांबळे, आकाश कांबळे, बापू खातेदार, राहुल कदम, विनोद केंगारे, लहू मधाळे, सुजाता खोत, तबसून जमादार, ज्योती पाटील, विनायक जाधव, शिवानंद जंगबाज, इराण पाटील, किरण इंदुलकर, महेश गिरी, ज्योती पाटील, कविता कांबळे, मंगल निंबाळकर, सुगंधा शिंदे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *