Monday , September 21 2026
Breaking News

गौरी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम; नंदन मक्कळधामातील मुलांना मायेचा आधार

Spread the love

 

बेळगाव : समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या गौरी महिला मंडळाने एड्सबाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या नंदन मक्कळधाम येथे भेट देत संवेदनशीलतेचा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श घालून दिला.

आश्रमातील मुलांशी मनमोकळा संवाद साधत महिला मंडळाच्या सदस्यांनी त्यांना मायेचा स्पर्श, आपुलकी आणि आत्मीयतेची अनुभूती दिली. केवळ वस्तूंचे वाटप न करता प्रेम, जिव्हाळा आणि समाज आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

‘फूल नाही तर फुलाची पाकळी’ या भावनेतून मंडळाने आश्रमासाठी तांदूळ, चहा पावडर, साबण, टॉवेल्स, बिस्किटे आदी दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. मुलांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आश्रमाच्या दैनंदिन कामकाजाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.

यावेळी गौरी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजातील वंचित आणि गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *