Sunday , September 20 2026
Breaking News

मराठा मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीत राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे “Design to Safety: Drug Discovery and Pharmacovigilance” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेस कर्नाटक, कोल्हापूर, पुणे, मुंबई, वडोदरा व राजस्थान येथील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर व पदवी विद्यार्थी तसेच प्रतिनिधी असे एकूण २२८ जण सहभागी झाले.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. टी. सुभात्रा (डोमेन एक्स्पर्ट, सिद्धा, ICMR–National Institute of Traditional Medicine, बेळगाव) यांनी औषध सुरक्षा व फार्माकोव्हिजिलन्सवरील प्रमुख व्याख्यानातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरित केले.

वैज्ञानिक सत्रामध्ये डॉ. श्रीराम डी. रानडे (मणिपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, MAHE) यांनी औषध शोध व फार्मास्युटिकल केमिस्ट्रीतील नव्या घडामोडींवर मार्गदर्शन केले, तर डॉ. संतोष रेड्डी (केएलई कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव) यांनी फार्मसी प्रॅक्टिस व फार्माकोव्हिजिलन्सचे औषध सुरक्षिततेतील महत्त्व स्पष्ट केले.

परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आयोजित ई-पोस्टर सादरीकरण स्पर्धा. विविध संस्थांतील संशोधक व विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केले. तज्ज्ञ परीक्षकांनी त्यांचे मूल्यमापन केले. दिवसभर सहभागी प्रतिनिधींनी वैज्ञानिक चर्चांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व तज्ज्ञांशी संवाद साधून ज्ञानवृद्धी केली.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल कुसनूर यांनी आयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली, तर सूत्रसंचालन कु. ज्योती तळगेरी यांनी प्रभावीपणे केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *