Sunday , September 20 2026
Breaking News

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; पार्वती नगर, कंग्राळी बी.के. आणि कंग्राळी के.एच. परिसरातील नागरिकांमध्ये भीती

Spread the love

 

बेळगाव : पार्वती नगर, कंग्राळी बी.के. आणि कंग्राळी के.एच. परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला आहे. विशेषतः लहान मुलांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात भीती पसरली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत चार लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनांनंतर मुलांना शाळेत जाणे, तसेच घराबाहेर खेळणेही धोकादायक वाटू लागल्याचे नागरिकांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर सोशल वर्कर टीमने बेळगाव महानगरपालिकेला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे, संवेदनशील भागांत विशेष मोहीम राबविणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, परिसरात नियमित नियंत्रण मोहीम राबवावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *