Wednesday , May 27 2026
Breaking News

बेळगाव

शिंदोळी सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात पालकांसह ग्रामस्थांचे आंदोलन!

  बेळगाव : शिंदोळी येथील सरकारी शाळा बंद करून ती ‘केपीएस मॅग्नेट’ योजनेअंतर्गत मास्तमरडी येथील शाळेत विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज शिंदोळी येथे पालकांनी, ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. ‘सार्कजनिक शिक्षण वाचवा’ समिती आणि ‘एआयडीएसओ’ (AIDSO) संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावी परिक्षेत शहरात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व शिष्यवृत्ती प्रदान

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक आणि समाजसेवक सुहास चांडक उपस्थित होते. प्रारंभी स्वरा मोरे आणि पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विकास महामंडळ, मुंबई आणि शाहू प्रकाशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योती कॉलेज, बेळगाव येथे बेळगाव शहर आणि शहरालगत असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शाळांतील सी.बी.एस.ई. (CBSE) आणि स्टेट बोर्ड दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ अत्यंत …

Read More »

“संगीत आशा” कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

  गायिका संगीता बांदेकर यांचे सुश्राव्य गायन : आशा भोसले यांच्या स्मृती जागवल्या बेळगांव : सुप्रसिद्ध गायिका सौ. संगीता बांदेकर – कुलकर्णी यांनी आशा भोसले यांची अजरामर गाणी सुमधुर आवाजात सादर करुन रविवारची (२४ मे) सायंकाळ सुरिली केली. त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करुन दाद दिली. येथील विवेकानंद …

Read More »

शिवम असोसिएट्स पाठोपाठ अन्य चार संशयित कंपन्या पोलीस रडारवर

  बेळगाव. – बेळगाव जिल्ह्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप शिवम असोसिएट्सवर झाल्यानंतर, जिल्ह्यातील आणखी चार बोगस कंपन्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी दिली. सोमवारी एका कन्नड वृत्तपत्राशी बोलताना मोहम्मद रोशन म्हणाले, गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात केपीआयडी (KPID) आणि बड्स (BUDS) कायद्याअंतर्गत एक विशेष …

Read More »

गो-रक्षणासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत : विहिंप व बजरंग दलाची मागणी

  बेळगाव : जिल्ह्यात वाढत असलेल्या गो-तस्करी आणि गो-हत्येच्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणून गो-हत्त्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही …

Read More »

सर्व्हर समस्येविरोधात रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  बेळगाव : रास्त भाव धान्य दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात अडथळे निर्माण होत असल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आले. दुकानदारांनी सांगितले की, महिन्याच्या सुरुवातीपासूनच सर्व्हर संथ गतीने कार्यरत असल्याने लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे …

Read More »

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अर्जुन गोरल यांना खरी श्रद्धांजली; शोकसभेत मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

  येळ्ळूर :येळ्ळूर गावचे सुपुत्र व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ व कणखर नेते यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे. ते कडक शिस्तीचे व स्पष्टवक्ते होते. त्यांनी येळ्ळूर गावाला दिशा देण्याचे काम केले. समाजासाठी लढणारा लढवय्या नेता आमच्यातून निघून गेल्यामुळे येळ्ळूर गावचे फार मोठे नुकसान झाले आहे. सीमा …

Read More »

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या श्रीराम कथेचे दि. 2 जून पासून बेळगावात आयोजन

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय व्याख्याते, प्रवचनकार आणि साहित्यिक असलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ‘श्रीराम कथा’ बेळगावात आयोजण्यात आली आहे. दि. २ जून ते दि. ७ जून या कालावधीत केळकर बाग येथील काणे महाराज राममंदिरात दररोज सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ही रामकथा सादर होणार आहे. वाचकप्रिय असलेल्या डॉ.शेवडे यांची …

Read More »

पहिले रेल्वे गेट कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

बेळगाव : टिळकवाडी परिसरातील पहिले रेल्वे गेट सोमवारी सकाळी अचानक एका बाजूने तुटून खाली कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. शुक्रवार पेठेकडील बाजूचे हे लोखंडी गेट अचानक पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी रहदारी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेच्या वेळी गेटाजवळून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी सतर्कता दाखवत तत्काळ आपली …

Read More »