Sunday , November 22 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये गणित विषयाची कार्यशाळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल वाढावा व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत यासाठी शिक्षण खात्यातर्फे वेगवेगळ्या विषयांच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. गणित विषयाची कार्यशाळा मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर हे होते. गणित विषयाचे जेष्ठ शिक्षक डी. एस. मुतकेकर यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला झाडाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले बेळगाव बी.आर.सी. चे आय. डी. हिरेमठ, सी.आर.पी. हिरेमठ व शंकर हे उपस्थित होते. शिक्षकांना रिसोर्स पर्सन संजय मजुकर मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कोमल गावडे व तिसऱ्या सत्रात सातेरी वड्डेबैलकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेळगावकर यांनी केले. नोडल अधिकारी कामत यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *