






बेळगाव : हुलबत्ते कॉलनी येथील तिसऱ्या क्रॉसवर दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान श्रीरामांची विधिवत पूजा-अर्चा करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच दीपोत्सवानिमित्त आकर्षक किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. दिव्यांची रोषणाई आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
या दीपोत्सवात प्रीती कामत, आरती ओझा, रोहिणी पवार, दिव्या ओझा, स्वाती हंगिरगेकर, रोहिणी हंगिरगेकर, शमा सांब्रेकर, प्रतीक्षा सांब्रेकर, सीमा मोरे, वीणा कर्णे, सरिता पाटील, माया पाटील, स्नेहा पाटील, वैशाली पाटील, पूजा पाटील, अक्षता कुलकर्णी, आरती चलवेटकर, नेतलकर आणि रेखा हट्टीकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सर्वांनी एकत्र येत भगवान श्रीरामांचे पूजन करून दीपोत्सवाचा आनंद लुटला. पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तसेच किल्ल्याच्या प्रतिकृतीमुळे दीपोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. एकत्रित सहभागातून आनंद, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta