Sunday , November 22 2026
Breaking News

सांबरा मराठी शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या नियोजनासाठी रविवारी माजी विद्यार्थ्यांची बैठक

Spread the love

 

सांबरा : येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवार, दि. २२ रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या सभागृहात माजी विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सांबरा येथे १८७७ साली या प्राथमिक मराठी शाळेची स्थापना झाली. दीडशे वर्षांची समृद्ध शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या शाळेचा वर्धापनदिन भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विचार आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सूचना, संकल्पना आणि सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

या बैठकीला सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून महोत्सवाच्या आयोजनाबाबत आपले विचार मांडावेत, असे आवाहन शाळा सुधारणा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *