Sunday , November 22 2026
Breaking News

आर्थिक व्यवहारातून पूनम डेळेकर हिची गळा आवळून हत्या; पोलीस तपासात निष्पन्न

Spread the love

 

बेळगाव : आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला वाद अखेर एका विवाहितेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहापूर-वडगाव परिसरातील पूनम अमित डेळेकर (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा शहापूर पोलिसांनी छडा लावला असून, तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० ऑक्टोबर रोजी पूनम डेळेकर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीपासूनच या मृत्यूभोवती संशयाचे धुके निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला होता. तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या मृत्यूमागील धक्कादायक कारण समोर आले.

पूनम डेळेकर आणि रंजन मरवे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होते. याच व्यवहारावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. पुढे या वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या द्वेषातून रंजन मरवे याने पूनम यांचा गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मृत पूनम यांच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *