बेळगाव : गांजा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या आरोपीचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरात घडली. गांजाच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी गावातील बसगौडा इरनगौडा पाटील (वय 45) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. हिंडलगा कारागृहातून चौकशी करण्यात …
Read More »बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; दोन अट्टल घरफोड्यांना अटक
बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईत बेळगावमधील दोन अट्टल घरफोड्यांना अटक करण्यात आली असून दोन्ही चोरांकडून लाखो रुपयांच्या दागिन्यांसह इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरात ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरांना बेळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावमध्ये चोरी करून गोव्यात कसिनोमध्ये मजा मारणाऱ्या दोन्ही चोरांकडून सुमारे …
Read More »सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी राजकुमार पाटील तर व्हा. चेअरमनपदी सतीश पाटील
बेळगाव : येळ्ळूर येेथील सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजकुमार क. पाटील व व्हा. चेअरमन पदी श्री. सतीश बा. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सन्मित्रच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सन् 2022-23 ते 2026-27 सालाकरिता पुढील 5 वर्षासाठी हा कार्यकाळ राहील, असे ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …
Read More »शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे ‘आनंदमेळा’चे आयोजन
बेळगाव : नोव्हेंबर 18, 19 व 20 असे तीन दिवस दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत रामनाथ मंगल कार्यालय, टिळकवाडी येथे खाद्य जत्रा/ ‘आनंद मेळा’चे आयोजन शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे केले जाणार आहे. विविध चटपटीत व रुचकर शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन मनपसंद कपड्यांच्या तसेच अनेक आकर्षक वस्तूंच्या खरेदीचा …
Read More »सांबरा येथे काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाला चालना
बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या सांबरा गावातील गणेश नगरात येणाऱ्या सर्व गल्ल्यांतील रस्त्यांच्या विकासाकरिता आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 50 रु. लाखांचे अनुदान मंजूर करून काँक्रीटचे रस्ते निर्मितीच्या कामाला चालना दिली आहे. आज आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सांबऱ्यात सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यापूर्वी 80 लाख रुपये मंजूर करून रस्त्यांची …
Read More »प्राईड सहेलीतर्फे अभय उद्यानाची स्वच्छता!
बेळगाव : सामाजिक कार्यात कायम अग्रस्थानी असलेल्या प्राईड सहलीच्या सदस्यांनी अभय उद्यान सराफ कॉलनी येथे भेट दिली. तेव्हा त्यांनी पाहिले खूप कचरा जमा झालेला आहे. झाडाची पाने गळून सगळीकडे पसरलेली आहेत. काही ठिकाणी झाडाची फळे पडून खराब झालेली होती. त्यांना मुंग्या लागलेल्या होत्या. या उद्यानाची नेहमीच स्वच्छता करण्यात येते. …
Read More »“गोल्डन स्क्वेअर”च्या बुद्धीबळपटूंची एससीएमए ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विशेष बाजी
बेळगाव (प्रतिनिधी) : धारवाड येथे नुकत्याच झालेल्या एससीएमए (SCMA) ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत एकूण 257 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला होता. स्पर्धेत बेळगाव बुद्धिबळ अकादमीने पहिला क्रमांक पटकाविला. अकादमीला पहिल्या क्रमांकाचे 4000 रुपयांचे रोख बक्षीस व …
Read More »तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेत अज्ञात व्यक्तीची हत्या
हुबळी : तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात काल रात्री अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. तिरुपती – हुबळी रेल्वे रात्री उशिरा हुबळी येथील बहट्टी येथे आली असता, डब्यांचे निरीक्षण करताना एका व्यक्तीचा खून झाला असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती …
Read More »सहनशील ‘स्त्री’ हे शक्तीचे प्रतिक! : आ.लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव (प्रतिनिधी) : स्त्रीमध्ये जीवन घडवण्याची शक्ती आहे. जन्मतःच आईची ताकद, वात्सल्य, सहिष्णुता, प्रेम, संयम, काळजी, आदरातिथ्य, सन्मान आणि सांत्वन हे गुण तिच्यात जन्मापासूनच रुजलेले असतात, म्हणूनच सहनशील स्त्री हे शक्तीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. अखिल भारत शरण साहित्य परिषद, कदळी महिला …
Read More »महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून देखील मराठी भाषा हद्दपार
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून देखील मराठी भाषा हद्दपार होणार आहे. महानगर पालिकेने पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. अंदाजपत्रकाबाबत बेळगावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अर्थतज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सूचना व सल्ला देण्याचे आवाहन केले आहे. पण या सूचना इंग्रजी व कन्नड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta