बेळगाव : बेळगावमधील तिरंगा कॉलनी येथील नाल्यात पाणी वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहात आहे. यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. बेळगावमधील तिरंगा कॉलनी शेजारी असलेल्या नाल्यात पावसामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या नाल्यातील पाणी रस्त्यावर ओसंडून वाहात आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून आजूबाजूच्या भागातील पाणीही या …
Read More »आयुर्वेदामुळे रोग समूळ नाहीसा होतो : आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे प्रतिपादन
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे आयुर्वेदाचे फायदे व उपचार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. प्रारंभी लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सरकारची आहे. इंग्लंडमध्ये ती सरकार घेते. तशी ती आपल्या सरकारनेही …
Read More »गणेशोत्सवाला न्यायालय, शासनाच्या निर्देशानुसार परवानगी गरजेची : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : न्यायालय व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव व इतर सण साजरे करण्याची संधी दिली जाईल, डीजे वापरावर बंदी असेल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बेळगाव शहर व जिल्ह्यात ३१ …
Read More »उचगाव येथे कृषी माहिती रथाला चालना
बेळगाव : कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना असून शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आज, सोमवारी एकात्मिक कृषी अभियान योजनेअंतर्गत बेळगाव उचगाव येथे 2022-23 या वर्षासाठी कृषी माहिती रथाला चालना दिली. कार्यक्रमाला …
Read More »सहकारी संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा प्रतिवर्षी गौरव करून प्रोत्साहन देणारी ग्रामीण भागातील ही सोसायटी अभिनंदनाला पात्र आहे, असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोज पावशे यांनी सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आयोजिण्यात आला होता याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संघाचे …
Read More »बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान!
बेळगाव : नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यात पेरणी केली होती. भातपिक जोमाने आले होते मात्र बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे संपूर्ण भातपिक नष्ट झाले आहे. तसेच लावणीसाठी टाकलेली तरू देखील कुजलेले आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र दुबार …
Read More »सिद्धरामय्या, डीकेशींची मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने हि स्वप्नेच राहणार : मंत्री उमेश कत्ती
बेळगाव : काँग्रेसमध्ये खुर्चीवरून सुरु असलेल्या घमासान वरून विजापूरमध्ये मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसमध्ये खुर्चीवरून अंतर्गत मतभेद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आतापासूनच सुरु आहे. मात्र राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार नाही, असा टोला उमेश कत्ती यांनी लगावलाय. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार हे कधीच …
Read More »स्वातंत्र्यानंतर आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकला नाही! : आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा टोला
बेळगाव : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकलेला पाहिला नाही, असा टोला आम लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप सरकारच्या हर घर तिरंगा या उपक्रमावर लगावला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप सरकारने आखलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेसंदर्भात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप आणि आर एसेसवर निशाणा साधलाय. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली. …
Read More »रोट्रॅक्ट क्लब बेळगावचा अधिकारग्रहण उत्साहात
बेळगाव : रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावचा 50 वा अधिकारग्रहण समारंभ काल रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न होऊन नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकारपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली. शहरातील हॉटेल सेंटोरिनी येथे पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रमुख (डीआरआर) रो. अंकित जाधव उपस्थित होते. याप्रसंगी …
Read More »बेळगाव दक्षिणच नव्हे तर अन्य मतदारसंघही आमचे लक्ष्य : केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी
बेळगाव : राज्यातील आगामी निवडणुकीत काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मास्टरप्लॅन आखला आहे. केवळ बेळगाव दक्षिण मतदारसंघ हे आमचे लक्ष्य नाही. सौंदत्ती, रायबाग, हारुगेरी या सर्व मतदारसंघात पक्षसंघटना मजबुतीच्या उद्देशाने बैठका घेतल्या जात आहेत, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव येथील दक्षिण मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीला रविवारी आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta