Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

चक्रतीर्थ यांची पाठ्यपुस्तक समिती रद्द करण्यासंदर्भात बेळगावात निषेध मोर्चा, निदर्शने

बेळगाव : रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. बेळगावातील चन्नम्मा चौकात प्रगतीपर संघटनांच्या वतीने बंडखोर साहित्यिक डॉ. वाय. बी. हेम्मडी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारने नेमलेली रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याची …

Read More »

बापट गल्ली येथील मशिदीसंदर्भात आम. अभय पाटील यांची जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

बेळगाव : बेळगाव शहरातील बापट गल्ली येथे आत्ता असलेल्या मशिदीच्या ठिकाणी मूळ मंदिर होते. या संदर्भात योग्य माहिती जाणून घेऊन कारवाईसाठी पावले उचलावीत, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे अभय पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी या मुद्द्यासंदर्भात चर्चा केली. आपण जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक …

Read More »

बेळगावात जिल्हास्तरीय खुली रोड रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने बेळगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील मराठा कॉलनीत रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय फ्री रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपमध्ये 160 हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक नंदकुमार मिरजकर यांनी केले. याप्रसंगी जायंट्सचे माजी फेडरेशन …

Read More »

सांबरा प्राथमिक मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

बेळगाव : शिक्षकांनी केलेले संस्कार, चुकीच्या वेळी केलेली शिक्षा, वर्गातील गमतीजमती, परीक्षेचा तणाव, निकालाची उत्सुकता अशा अनेक आनंदी तर काही भावनिक आठवणींना उजाळा देत सांबरा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 1994- 2001 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात …

Read More »

मातृभाषेतुन शिक्षण घेणे, हाच भविष्यातील पाया आहे : प्रा. मनीषा नाडगौडा

बेळगाव : आत्मविश्वासातून आयुष्यात चांगले वळण लागते. अभ्यासाबरोबरच छंद जोपासावा, खेळात प्राविण्य मिळवावे जिद्द कसोटीतून आपण आपले ध्येय गाठू शकतो आदर, प्रामाणिकपणा हेच गुण जीवनात यशस्वी करू शकतात. मातृभाषेतून शिक्षण घेणे हाच भविष्यातील पाया आहे, असे प्रतिपादन प्रा. मनीषा नाडगौडा, बी.डी. जती कॉलेज यांनी अध्यक्षपदावरून विद्यार्थी गौरव सोहळ्यात विचार व्यक्त …

Read More »

मुख्याध्यापक वाय. एच. पाटील व एस. एन. जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

बेळगाव : पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश हायस्कूल बिजगर्णीचे (ता. बेळगाव) मुख्याध्यापक वाय. एच. पाटील व लिपिक एस. एन. जाधव यांचा शुक्रवारी (ता.२७) निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. हायस्कूलच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला. व्यासपीठावर …

Read More »

कावळेवाडीचा उदयोन्मुख कुस्तीपटू पै. रवळनाथला दहा हजाराचे सहकार्य

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयच्या वतीने गावातील शाळेत पै.रवळनाथ श्रीधर कणबरकर याचा सन्मान करण्यात आला. रवळनाथ हा नुकताच हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन आला आहे. बाबा भोलादास आखाड्यात दीड महिना सराव केला. सोनिपत खरकोदा येथील राष्ट्रीय पातळीवर कुस्ती कोच अशवनी दया यांच्याकडे त्याने प्रशिक्षण …

Read More »

अक्षता नाईक उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

बेळगाव : अतिशय निष्ठेने पत्रकारितेचे व्रत हाती घेतल्याबद्दल तसेच समाजात कर्तृत्वाने यश साध्य करता येते हे दाखवून देत गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल अक्षता नाईक यांचा युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर सन्मान सोहळा कोल्हापूर येथील नष्टे लॉन येथे आज …

Read More »

बेळगावात कन्नड साहित्य भवनात अज्ञाताचा गोंधळ

बेळगाव : बेळगावातील कन्नड साहित्य भवनातील महिला शौचालयात घुसुन रविवारी सकाळी एकाने चांगलाच गोंधळ घातला. त्याला बाहेर काढण्यासाठी भवनाचे कर्मचारी आणि पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. आज सकाळी 7 च्या सुमारास भवनातील महिलांसाठी असलेल्या शौचालयात घुसून या बहाद्दराने आतून कडी लावली. काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नव्हता. भवनच्या …

Read More »

बेळगावात महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन

बेळगाव : जुलमी मोगली राजवटीविरोधात तगडी झुंज देऊन देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या मेवाडचे शूर रजपूत राजे महाराणा प्रताप यांच्या 482व्या जयंतीनिमित्त बेळगावात रविवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. शहर-परिसरातील रजपूत समाज बांधवांच्या वतीने यानिमित्त महाराणा प्रताप यांच्या अर्ध पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. …

Read More »