बेळगाव (वार्ता) : बेळगाव तालुक्याच्या न्यू सैनिक सोसायटीमध्ये गुंतवलेल्या पैशांना परत न करता सोसायटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावकर ठेवीदारांनी आमचे पैसे परत द्या, असे आवाहन केले. येळ्ळूर येथील न्यू सैनिक सोसायटीमध्ये शेकडो ग्राहकांनी पैसे गमवले आहेत. पैसे परत मागितले असता पैसे परत करणार नाही, असे संतापजनक वक्तव्य सोसायटीच्या …
Read More »अखेर सौंदत्ती श्री रेणुकादेवीसह बेळगाव जिल्ह्यातील मुख्य देवस्थान बंद आदेश जारी
बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोना आणि ओमीक्रॉनचे संकट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल मंगळवारी नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. आगामी दोन आठवडे रात्रीच्या कर्फ्यु बरोबरच शनिवार आणि रविवारी विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्याचबरोबर पुढील दोन आठवडे सामाजिक, राजकीय मेळावे, समारंभावर निर्बंध लादले आहेत. मोर्चे, यात्रा …
Read More »जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना आयोजित रविवारचे कुस्ती मैदान लांबणीवर….
बेळगाव – मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानाच्या तयारीसाठी कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारीही चालविली होती. बेळगाव परिसरातील कुस्तीगीर आणि कुस्ती शौकिनांना आनंदवाडी येथील रविवारच्या कुस्ती मैदानाचे वेध लागले होते. दरम्यान शासनाने वाढत्या कोरोना …
Read More »स्केटिंगपटू अवनिशचा आणि आराध्याचा गौरव
बेळगाव : बेळगावचे स्केटिंगपटू अवनीश कामनावर आणि आराध्या पी. यांनी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या 59 व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवित पदक पटकाविले. 11 ते 21 डिसेंबर 2020 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती. या यशाबद्दल अवनीश कामनावर आणि आराध्या पी या स्केटिंगपटूंचा रेल्वे …
Read More »स्मशानभूमीसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव (वार्ता) : कणबर्गी गावातील परिशिष्ट जातीच्या लोकांना स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली कणबर्गी येथील परिशिष्ट जातीच्या नागरिकांनी आज जिल्हाधिकार्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. बेळगाव तालुक्यातील महानगरपालिकेच्या व्याप्ती येणार्या कणबर्गी …
Read More »विमल फाऊंडेशन आयोजित भव्य कबड्डी, खो-खो स्पर्धेचे 16 जानेवारी रोजी आयोजन
बेळगाव (वार्ता) : महाद्वार रोडवरील श्री धर्मवीर संभाजी उद्यानाच्या मैदानावर विमल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्यावतीने दुसर्या विमल जाधव स्मृती चषक खुल्या कबड्डी व खो-खो पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन रविवार ता. 16 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता प्रारंभ होणार आहे अशी माहिती विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी दिली आहे. …
Read More »भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमध्ये लसीकरण अभियान यशस्वी
बेळगाव (वार्ता) : येथील भारतीय गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. हा लसीकरण उपक्रम उचगाव आरोग्य केंद्रातर्फे राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी वाय. पी. नाईक उपस्थित होते. प्रारंभी कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उचगाव आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. स्मीता गोडसे यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार …
Read More »लस घेऊन युवकांनीही कोविड विरोधातील लढ्यात आघाडी घ्यावी : पालकमंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत भारतात युवावर्गाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच आपल्या देशाला यंग इंडिया म्हणून ओळखले जाते. कोविड विरोधातील लढ्यातही युवावर्गाने लसीकरण करून घेऊन आघाडीवर रहावे, असे आवाहन जलसंसाधन खात्याचे व जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले. बेळगावातील एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयात सोमवारी १५ ते १८ वयोगटातील किशोरांच्या …
Read More »निरपराध कार्यकर्त्यांची त्वरीत सुटका करा : माजी नगरसेवक संघटनेची मागणी
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळा विटंबनेनंतर बेळगावात झालेल्या दगडफेक की प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निरपराध मराठी युवक आणि हिंदू कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरकारने त्वरित मागे घ्यावेत आणि जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना गजाआड करून कठोर शासन करावे, अशी मागणी बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली …
Read More »पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये कोविड19 लसीकरण कार्यक्रम
बेळगाव : येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये कोविड19 लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक मंगेश पवार यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी प्राध्यापक जी. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून लसीकरण मोहिमेचा उद्देश सांगितला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta