Friday , April 17 2026
Breaking News

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांसाठी 12 मे रोजी मतदान

  मुंबई : निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार भाजपला 5 जागा, शिवसेनेला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि …

Read More »

बेळगाव सीमावादावर पाठपुरावा वाढवणार; खासदार सुनील तटकरे यांची भूमिका स्पष्ट

  रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी ठोस भूमिका मांडत हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असून त्यावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी व्यक्त केले. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायलायामध्ये प्रलंबित असल्याने त्याच्या लवकर सुनावणीसाठी आणि निकालासाठी …

Read More »

ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात भीषण टक्कर; 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या!

  मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. …

Read More »

शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा

  चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत शिनोळी बु. येथे रामनवमी पारायण सोहळ्यानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पालक तसेच आजी-आजोबा यांचा विधीवत पाद्यपूजन सोहळा भावनिक आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जपणूक यांचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आप्पाराव …

Read More »

सुरांचा अमूल्य ठेवा हरपला; ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

  मुंबई : भारतीय संगीतविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ज्येष्ठ गायिकेने मुंबईतील ब्रीच …

Read More »

एक लाख स्वाक्षरी मोहिमेला नैतिक बळ; श्रीवर्धन तालुका पत्रकार संघाचा पाठिंबा

  माणगांव : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळावी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, या उद्देशाने राज्यभरातील पत्रकार संघटनांकडून ठोस भूमिका घेतली जात आहे. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील सुमारे ४० लाख मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्याय व दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर या चळवळीला अधिक धार प्राप्त झाली …

Read More »

रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  माणगाव : बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही भेट देऊन या मोहिमेला अधिक बळ दिले जाणार …

Read More »

समरजीत घाटगेंची पुन्हा भाजप वापसी; मुंबईत 8 एप्रिल रोजी करणार पक्ष प्रवेश

  कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांचा पुन्हा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळू शकल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा समरजीत घाडगे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि …

Read More »

नाशिकमध्ये मोटार विहिरीत कोसळून सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू

​ नाशिक : खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. क्रेनच्या साहाय्याने रात्री ही मोटार बाहेर काढण्यात आली. ​दिंडोरी …

Read More »

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मोहिमेला रायगड पत्रकारांचा जाहीर पाठिंबा

  रायगड (नरेश पाटील) : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात 22 वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे दाव्याची सुनावणी जलद गतीने व्हावी यासाठी सरन्यायाधीशांना 1 लाख सह्यांचे निवेदन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. सदर सह्यांच्या मोहिमेला रायगड जिल्ह्यातून, विशेषतः माणगाव तालुक्यातील पत्रकारांकडून जाहीर पाठिंबा मिळताना दिसत …

Read More »