Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

ना. सुभाष देसाई यांच्याहस्ते उद्या प्रबोधन कौशल्य निकेतनचे उद्घाटन होणार

माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री ना. सुभास देसाई यांच्या हस्ते शनिवारी दि. ७ मे रोजी सायंकाळी ५ वा. जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी बामणोली रोड माणगांव येथे प्रबोधन कौशल्य निकेतन पहिला टप्पाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला ना. सुभाष देसाई यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती …

Read More »

’लोकराजा’ला अभिवादन : …अन् 100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाले!

कोल्हापूर : रयतेचे राजे राजर्षी शाहू छत्रपतींना स्मृती शताब्दीनिमित्त आज कोल्हापुरात अभिवादन करण्यात आले. त्यासाठी कोल्हापुरीतील तमाम जनता आज (दि. शुक्रवार) सकाळी 10 वाजता 100 सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहिली आणि लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली. राजर्षी शाहू छत्रपतींचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यानिमित्त लोकराजा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला धक्का; दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणा संदर्भात आज महत्वपूर्ण सुनावणी होती, यावेळी न्यायालयाने दिलेल्या …

Read More »

संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत राहण्याची शक्यता; काँग्रेस की शिवसेना याचा लवकरच फैसला

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करत राज्यभर चर्चेत आलेले संभाजीराजे छत्रपती यांची नवी राजकीय इनिंग लवकरच सुरू होणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपल्याने त्यांची नवी राजकीय वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेने होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामध्येही शिवसेना की काँग्रेस यांचा फैसला होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत. …

Read More »

मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे मी आभार मानतो : राज ठाकरे

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्यभरात सुरू असलेल्या गदारोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे आभार मानले आहेत. ’महाराष्ट्रात 90 ते 92 टक्के ठिकाणी आज सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. या मशिदी चालवणार्‍या मौलवींचे …

Read More »

ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाबाबतचा जुना व्हिडीओ राज ठाकरे यांनी ट्विट केला होता. बाळासाहेबांच्या भाषणाचे कॅसेट्स पाठवू त्या पहा. सर्व भोंगे बंद करा असे …

Read More »

अखेर राणा दाम्पत्याला दिलासा, सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यायालयाने राणा …

Read More »

नागनवाडीच्या प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील ‘उंबळट ‘ व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘उंबळट’ हे प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे (नागनवाडी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणांचं पुस्तक स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे. चंदगडी भाषेला मराठीची बोलीभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. चंदगडीमध्ये ललित लेखन होऊ लागलेले आहे. परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित होणारे ‘उंबळट’ हे पहिले व्यक्तीचित्रण …

Read More »

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांचा मांडेदुर्गचे कोच राम पवार यांच्या घरी सत्कार

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या बावीस वर्षाचा कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ संपवून मानाची गदा पटकावल्याचा विशेष आनंद झाल्याची भावना महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरी कुस्तीची परंपरा असून त्याचबरोबर सैन्य दलातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मांडेदुर्ग (ता. चंदगड)चे कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला प्रोत्साहन …

Read More »

चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांची ८८ जयंती रक्तदान शिबिराने साजरी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त आज म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली.या रक्तदान शिबिरमध्ये पंचक्रोशितिल एकूण 70 तरुणांनी रक्तदान केले. तसेच स्व. नरसिंगराव पाटील यांचा म्हाळेवाडी येथील सहकार संकूलनामध्ये अर्धपुतळ्याचे आमदार …

Read More »