Friday , October 18 2024
Breaking News

महाराष्ट्र

अध्यादेश निघेपर्यंत माघार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

  मुंबई : सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज वाशी येथील शिवाजी चौकात मराठ्यांच्या अफाट जनसमुदायासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी सरकारसमोर अनेक मागण्या ठेवल्या आहेत. त्यात प्रमुख म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे. सरकारी नोकरीत आमच्या जागा राखून ठेवा. ही मागणी …

Read More »

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

  शहराच्या विकासासाठी मंदिर परिसर विकास आराखड्याला सहकार्य करण्याचे व्यापाऱ्यांचे आश्वासन कोल्हापूर (जिमाका): श्री अंबाबाई मंदिर हे चिरंतन टिकणारे मंदिर आहे. मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देवून कोल्हापूर शहर आणि येणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, …

Read More »

बेळगाव सीमाप्रश्न महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी विसरत चालली आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार

  मुंबई : ‘बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचाच असून बेळगाव सीमाभागा विना संयुक्त महाराष्ट्र अपुरा आहे पण महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी हा बेळगाव सीमाप्रश्न विसरत चालली आहे. या बेळगाव सीमासंदर्भात महाराष्ट्रातील साहित्यिकानी सदैव आपल्या प्रखर लेखणी द्वारे समाज जागृती करणे महत्वाचे असून महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला बेळगाव हा महाराष्ट्राचा भूभाग असून …

Read More »

रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

  मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यालयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर …

Read More »

अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात; संजय राऊतांचा खोचक टोला

  मुंबई: भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे, असा …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून गुजरात आणि देशात भिंत उभं करण्याचे काम; ठाकरेंचा वार

  नाशिक : निवडणूक आल्याने पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत, हे असलं हिंदुत्व मान्य नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मिरची तोडणीला निघालेल्या मजुरांची नाव उलटली, 6 महिला बुडाल्या

  गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. स्थानिकांच्या मते, सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला असेल. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु …

Read More »

जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, त्यांना सद्बुद्धी मिळो; मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र

  ठाणे : अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळची प्रतीक्षा अखेर संपली. अयोध्येत राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरातून मुख्यमंत्री शिंदेंनी तर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाईव्ह सोहळा पाहिला. राममंदिराला लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासह भेट देणार आहे. आजचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा …

Read More »

कोल्हापुरात घोडा मैदान स्पर्धेवेळी घोड्यांपुढे धावणाऱ्या जीपचा भीषण अपघात, 8 ते 10 जण जखमी

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झाला. घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेकजण उभं असलेली जीप वेगाने धावत होती. अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली. यानंतर या जीपमध्ये उभे असलेले 8 ते 10 जण थेट जीपखाली आले. त्यामुळे या …

Read More »

राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

  नवी दिल्ली : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी महत्त्वाच्या निकालाचं वाचन केलं. त्यानुसार, ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले असून खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याविरोधात कायदेविषयक लढाई लढण्याकरता त्यांनी आता सर्वोच्च …

Read More »