Friday , December 27 2024
Breaking News

महाराष्ट्र

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू

  ठाणे : ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. ठाण्याच्या बाळकुम परिसरात …

Read More »

“मी हात जोडून आवाहन करतो की…”; पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंची मराठा समाजाला साद

  जालना : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू असतानाच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी …

Read More »

महाडिक गटाला मोठा धक्का, राजाराम कारखान्यातील शौमिका महाडिकांसह 1272 सदस्य अपात्र

  कोल्हापूर : महाडिक गटाला मोठा धक्का बसला असून राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1272 सदस्य अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबीयांतील 10 जणांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर साखर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या आधीच बोगस सभासदांचा …

Read More »

कोल्हापुरात भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या

  कोल्हापूर : सोशल मीडियावर पोस्ट करीत भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज पुलाची शिरोली (तालुका हातकणंगले) येथे आज घडला. सानिका नानासाहेब निकम (वय १६) आणि अरबाज शब्बीर पकाले (वय १८, रेणुका नगर शिरोली पुलाची) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन

  मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले आहे. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांनी वयाच्या …

Read More »

सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू

  सिंधुदुर्ग : भारतीय संस्कृती, परंपरांचे रक्षण, संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करण्यात आली आहे. अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, …

Read More »

वैजनाथ मंदिर परिसराची भारत विकास ग्रुप (BVG) कडून स्वच्छता मोहीम

  शिनोळी : देवरवाडी येथील प्रसिद्ध वैजनाथ मंदिर येथे भारत विकास ग्रुप (BVG) कडून पवित्र श्रावण महिन्यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम करण्यात आली. यावेळी मुख्य मंदिर गाभारा व आरोग्य भवानी माता मंदिर उच्च दाब पाणी मशीन ने पाणी मारून मंदिरातील सर्व ठिकाणी स्वच्छता केले. या स्वच्छता कामी मुख्य …

Read More »

नागपंचमीला पाळणा देण्याची अन बेल्ले फिरवण्याची चंदगड तालुक्यातील आगळी – वेगळी प्रथा

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्याबरोबर सीमाभागात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावण महिण्यातील पाहिला येणार सण म्हणजे नागपंचमी. सर्वाधिक खाद्य पदार्थ खायला मिळणाऱ्या या सणामध्ये नवीन लग्न झालेल्या वधूच्या घरी वराच्या घराकडून सजवलेला लहान पाळणा पाठवण्याची आगळी -वेगळी परंपरा चंदगड तालुक्यात अजूनही टिकून आहे. तर …

Read More »

प्रा. नागेंद्र जाधव करणार बेमुदत धरणे आंदोलन…

शिनोळी : श्री वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेमणुकीत प. महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दि. २८ ऑगस्ट २०२३ पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत देवरवाडी यांनी ग्रामसभा घेऊन श्री वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती गठित …

Read More »

डॉ. दाभोलकर हत्येचा तपास भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच जबाबदार!

  श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सुरूवातीपासूनच पूर्वग्रहदूषित पणा ठेऊन एकांगी आणि राजकीय विचारांनी केला गेला. अध्यात्माचा प्रसार आणि सामाजिक कार्य करणार्‍या सनातन संस्थेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला गेला. दाभोळकरांचा खून सनातनच्या साधकांनी केला आहे’, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने …

Read More »