Friday , December 27 2024
Breaking News

महाराष्ट्र

अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; सुनावणी तूर्त लांबणीवर

  नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. हे प्रकरण आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य यादीत होते. मात्र मुख्य यादीत हे प्रकरण येऊ शकले नाही. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने हे प्रकरण न्यायालयासमोर नमूद करण्यात आले आहे. …

Read More »

शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर

  रायगड : शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पनवेल, उरण, पेण मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याची माहिती मिळाली आहे. या चारही मतदारसंघात पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. शेकापने अलिबागमध्ये मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चार उमेदवारांची घोषणा केली. शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचे मोठं शक्तिपर्दशन केल्याचे …

Read More »

परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. राज्यात तिसरी आघाडी तयार झाली असून परिवर्तन महाशक्तीने पहिली उमेदवार यादी आज जाहीर केली. परिवर्तन महाशक्तीने १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत ही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्तीने अचलपूर, रावेर, चांदवड, राजुरा, …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 जणांची पहिली यादी जाहीर

  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज अखेर आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 99 उमेदवारांची नावे आहेत. फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, मागील निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. यादी …

Read More »

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात 274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर व 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील सर्व क्षेत्रीय …

Read More »

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना जिल्ह्यातील कागल व चंदगड या जागा महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निश्चित मानली जात आहे. यामध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांना चंदगडच्या उमेदवारीचे संकेत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी पवारांचा उमेदवार अमान्य करण्याचे धोरण अवलंबले असून, यातूनच रविवारी डॉ. …

Read More »

महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना : शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी ६ हजार रुपये

  मुंबई : केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्यात नमो शेतकरी योजना राबवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांनी …

Read More »

निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तयारीबाबत घेतला आढावा

  कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तात्काळ दुरुस्ती …

Read More »

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 तारखेला निकाल

  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार …

Read More »

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी

  मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. …

Read More »