Friday , December 27 2024
Breaking News

महाराष्ट्र

बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; कोट्यवधींच्या एसआरए प्रकल्पाचा विरोध नडला

  मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या हत्येचे नवनवे कंगोरे आणि नवनवे अँगल समोर येत आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकजण फरार झाला आहे. एकीकडे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना, दुसरीकडे या हत्येचं नवं कनेक्शन समोर आलं आहे. दोन एसआरए प्रकल्पाला विरोध केल्यामुळे बाबा …

Read More »

चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. चंदगडमधील भाजप नेते शिवाजी पाटील यांनी मेळावा घेत उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. या मेळाव्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी …

Read More »

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी खूप गाजत असून अनेक नामवंतानी वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षण करून कौतुक केले आहे. या कादंबरीला अल्पावधित चौदा राज्यस्तरीय मराठी वाड्:मय पुरस्कार मिळालेले आहेत. या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला वाचकांनी भरभरून प्रतिसाद व दाद दिली आहे. प्रेमाचं आदर्श प्रतिबिंब …

Read More »

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

  मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सतत लोकांना हसवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ५७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. त्यांनी आजवर अनेक विनोदी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. …

Read More »

उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात

  कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून (१४ ऑक्टोबर) बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहे. यात्रेचा उद्यापासून हा शेवटचा टप्पा असेल. या यात्रेची सांगता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या मतदारसंघांमध्ये होणार आहे. सांगता सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, येत्या आठवड्यामध्ये विधानसभेसाठी बिगुल …

Read More »

डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक

  कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे गौरवोद्गार; विद्यापीठाच्या वतीने केला सत्कार कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित झाला असतानाच डॉ. तारा भवाळकर यांच्यासारख्या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक-साहित्यिकेची नवी दिल्ली येथे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा अत्यंत चांगला संकेत असल्याचे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर …

Read More »

पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन

  पंढरपूर : आषाढी यात्रेनंतर येणाऱ्या प्रमुख पंढरपूर यात्रेतील कार्तिकी एकादशी यंदा १२ नोव्हेंबरला होणार आहे. त्या निमित्ताने ४ ते २० नोव्हेंबर या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे; अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पंढरपूरला वर्षभर भाविकांची रीघ सुरु असते. मात्र …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

  मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आठवड्याभरात अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दोन नेत्याच्या मृत्यूने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार …

Read More »

चंदगड तालुका डिजिटल मीडियाची नवी कार्यकारिणी अध्यक्षपदी संपत पाटील तर उपाध्यक्षपदी राहुल पाटील

  चंदगड : ८६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया परिषदेच्या चंदगड शाखा अध्यक्षपदी सीएल न्यूजचे संपादक संपत पाटील यांची तर सरचिटणीसपदी सत्य घटना डिजिटलचे संपादक राहुल पाटील यांची निवड जिल्हा कार्यकारणी कडून जाहीर करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न …

Read More »

शेवाळे येथे संचिता संतोष गावडे होम मिनिस्टर पैठणी विजेती

  शिवाळे (ता. चंदगड) येथील ॐकार नवचैतन्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी “होम मिनिस्टर” स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संचिता संतोष गावडे यांनी विजेतेपद पटकावले, तर संगिता भैरू पाटील उपविजेती ठरली. संचिता …

Read More »