Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक

  लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे आज (7 जून) हिंदुत्ववादी संघटनेला पुकारलेला बंद आणि केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मंगळवारी (6 जून) दुपारी आक्षेपार्ह स्टेट्स आणि कोल्हापूर शहरात व्हायरल मेसेजवरुन परिस्थितीचा अंदाज असतानाही पोलीस यंत्रणेला हिंसक जमावाला पांगवण्यासाठी तब्बल अडीच तास …

Read More »

कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे दूरसंचार कंपन्यांना आदेश; आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाचा निर्णय

  कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग …

Read More »

कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण, कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी थेट रस्त्यावर

  परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणण्याचे गृहखात्याचे निर्देश कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (7 जून) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याला …

Read More »

आक्षेपार्ह स्टेट्सप्रकरणी उद्या कोल्हापूर शहर बंदची हाक

  कोल्हापूर : एका तरूणाने जातीय तेढ निर्माण करणारा स्टेटस लावल्याने कोल्हापुरात आज (दि.६) तणावपूर्ण वातावरण बनले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील दसरा …

Read More »

वादळी पावसात रायगड चढला पण महादरवाजाजवळ पोहोचताच तरुणाचा दुर्देवी मृत्यू

  रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा सोहळा रायगडावर साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड चढताना अंगावर दरड कोसळल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू झाल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. ही घटना रविवारी (05 जून) घडली. या घटनेने परिसरात शोककळा …

Read More »

शिवराज्‍याभिषेक दिन : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

  रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री, आमदार, खासदार या सोहळ्याला उपस्‍थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्‍त रायगडावर दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या …

Read More »

कोल्हापूर : बामणी येथील शेतात आढळला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय

  सिद्धनेर्ली : कागल- निढोरी राज्य महामार्गावर बामणी (ता. कागल) हद्दीतील शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाच्या डोक्यात जबर दुखापत झाली आहे. या तरुणास अन्य ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकण्यात आला होता. त्याची ओळख पटविण्याचे काम कागल पोलिसांकडून करण्यात आले आहे. अमरसिह दत्तात्रय थोरात (वय …

Read More »

वडणगे येथे दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; मधुमेहावरील औषध घेतल्यानंतर आली रिॲक्शन

  कोल्हापूर : वडणगे (तालुका करवीर) येथील दिंडे कॉलनीमध्ये राहणारे मधुकर दिनकर कदम (वय 59) व जयश्री मधुकर कदम या दाम्पत्याचा बुधवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन येऊन या पती-पत्नीचा मृत्यू झाला असावा. अशी शक्यता या दापत्याच्या मुलींनी वर्तवली आहे. दोघांचाही व्हिसेरा राखून ठेवण्यात …

Read More »

40 टक्क्यांचा कर्नाटकी पॅटर्न कोल्हापुरात येतोय; आम्ही आणलेल्या निधीत सत्ताधाऱ्यांकडून आडकाठी; आमदार सतेज पाटील यांची सडकून टीका

  कोल्हापूर : आम्ही मंजूर करून आणलेल्या निधीत सत्ताधारी आडकाठी घालत आहेत. रस्त्यांसाठी आणलेला निधी बाकडी आणि ओपन जीमसाठी वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. इतरत्र निवडणुका होत आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत असल्याचा हल्लाबोल माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील …

Read More »

आठवडाभरात मान्सूनचं केरळात आगमन, तर त्यापूर्वी राज्यभरात अवकाळीचा इशारा

  मुंबई : पुढच्या आठवडाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता …

Read More »