Tuesday , September 17 2024
Breaking News

महाराष्ट्र

बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

  पंढरपूर : राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करुन त्याला सुजलाम सुफलाम ठेव. त्याच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाकडे मागितले आहे. तसेच राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढं मागणं विठुरायाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज …

Read More »

चंदगड एस टी आगार व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस, प्रवाशांचे मात्र हाल

  कोवाड : चंदगड एस टी आगारामध्ये आगार व्यवस्थापक, आगार प्रशासन व चालक वाहकामध्ये विविध कारणावरून धुसफुस चालू असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असल्याने हा वाद नेमका मिटणार कसा? यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. चंदगड एस टी आगार गेल्या दोन वर्षापासून विविध प्रकारे चर्चेत आले …

Read More »

श्रीराम विद्यामंदीर शिनोळी खुर्द येथे नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

  शिनोळी (रवी पाटील) : श्रीराम विद्यामंदीर शिनोळी खुर्द येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच परशराम निंगाप्पा पाटील होते. नूतन इमारत लोकार्पणाचा उदघाटक रोजगार हमी योजना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते पूजन व फित कापून करण्यात आले. कोनशिला उद्घाटन दिपकराव भरमूआण्णा पाटील, मायाप्पा …

Read More »

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न

  मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी कोल्हापूर : नृसिंहवाडी दत्त मंदिरात मंदिराच्या गाभाऱ्यात पहाटे 4 वाजता पाणी गेलं आणि दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोल्हापुरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. कृष्णा नदीतील पाण्याने पहाटे 4 वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिणदार द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. …

Read More »

पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; खासगी बस दरीत कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू

  नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »

श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या दोन विद्यार्थ्यांची ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड

  शिनोळी (रवी पाटील) : श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या कु.आरोही पुंडलिक पाटील आणि कु. तनिष्का गणपती मनोळकर या विद्यार्थिनींनी ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तालुक्यातील १२ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी या दोन विद्यार्थिनींची निवड झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, ग्रामपंचायत …

Read More »

वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीने न्हाऊन निघालेल्या राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ …

Read More »

महाराष्ट्रातील ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा

  मुंबई : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही राज्यात राबवण्यात आली आहे. देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा आता ज्येष्ठांना करता येणार आहे. या संदर्भात रविवारी सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व …

Read More »

विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांची होणार काँग्रेसमधून हकालपट्टी?

  मुंबई : काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार असून त्यामध्ये फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपाचा संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात 15 ते 29 जुलै दरम्यान बंदी आदेश लागू; हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 15 ते 29 जुलै या कालावधीत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. किल्ले विशाळगडमधील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. मोहरम …

Read More »