Sunday , September 8 2024
Breaking News

मुख्य बातमी

आज राज्यसभा निवडणूक; मतबेगमीसाठी सगळ्यांची धावाधाव

मुंबई : आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. माजी मंत्री अनिल देशमुख …

Read More »

खूषखबर… मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात

पुणे : तमाम महाराष्ट्रवासियांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. राज्याच्या सीमेवर गेला सुमारे आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून येत्या दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होणार आहे; तसेच येत्या पाच दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांतही पावसाच्या सरी बरसणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या पारंपरिक वेळापत्रकानुसार तो …

Read More »

देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत आठ वर्षात आठपटीने वाढ

नवी दिल्ली : देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत मागील आठ वर्षांच्या कालावधीत आठपटीने वाढ झाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘बायोटेक स्टार्टअप एक्स्पो’ चे उद्घाटन करताना केले. दोन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील बायोटेक स्टार्टअप्सनी सहभाग घेतलेला आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व क्षेत्रांना मजबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. आधीच्या …

Read More »

राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक …

Read More »

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होणार; आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर …

Read More »

‘टीआरएस’ला शह देण्यासाठी भाजपकडून हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

नवी दिल्‍ली : तेलंगणचे मुख्यमंत्री आणि टीआरएस नेते के. चंद्रशेखर राव यांनी मागील काही काळापासून भाजपवर सडकून टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपने टीआरएसला शह देण्‍यासाठी नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून 2 आणि 3 जुलै रोजी हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. राज्‍यात पुढील वर्षी …

Read More »

अरब देशांविरोधात मोदी सरकार उभे ठाकू शकत नाही, स्वामींचा घरचा आहेर

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी नुपूर शर्मा प्रकरणी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मोदी सरकार अरब देशांविरोधात उभे ठाकू शकत नाही’, अशा शब्दांमध्ये बुधवारी स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. भारत सरकारने इस्त्रायल विरोधात आणि दहशतवादी संघटना ‘हमास’ च्या …

Read More »

आरबीआरचा दणका; सर्व प्रकारची कर्जे पुन्हा महागली!

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व बँकेने आज आपलं नवं पतधोरण जाहीर केलं आहे. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता रिझर्व बँकेचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार …

Read More »

भाजपा सरकारला ‘हिंदू दहशतवादी’ म्हणत अल-कायदाची भारतात आत्मघातकी हल्ल्यांची धमकी; दिल्ली, मुंबईचाही केला उल्लेख

नवी दिल्ली : अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेनं गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिलाय. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत, असं या दहशतवादी संघटनेनं म्हटलंय. भाजपाच्या …

Read More »

मान्सून 6 दिवसांनी लांबला!

पुणे : राज्यात सध्या सगळेचजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितलं. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस 38% कमी होण्याची शक्यता असल्यची माहिती खचऊ ने …

Read More »