Friday , June 13 2025
Breaking News

केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकारचा मोठा दिलासा, महागाईत भत्त्यात वाढ

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करणार आहे.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. पाच टक्क्यांची वाढ झाल्यास पगारात जवळपास 34000 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्त्यात होणारी वाढ ही All India Consumer Price Index (AICPI) च्या आकडेवारीने होते. -खउझख नुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांना किती महागाईचा भत्ता दिला जावा याचा निर्णय घेतला जातो. AICPI च्या निर्देशांकानुसार, मार्च 2022 पासून महागाईत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना पाच टक्के महागाई भत्ता वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 39 टक्के इतका होणार. केंद्र सरकाकडून दरवर्षी दोन वेळेस महागाई भत्त्यात वाढ केली जाते. साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते.
वर्ष 2022 च्या सुरुवातीचला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महागाई निर्देशांकात घट झाली असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
महागाई भत्त्याची सुरुवात कधी?
वाढती महागाई लक्षात घेता राहणीमानाचा स्तर कायम राखण्यासाठी केंद्रीय कर्मचार्‍यांना तसेच राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देण्यात येतो. देशात सर्वप्रथम, मुंबईमध्ये 1972 साली महागाई भत्ता देण्यात आला. त्यानंतर त्याचे अनुकरण केंद्र सरकारने करत केंद्रीय कर्मचार्‍यांनाही महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला.

About Belgaum Varta

Check Also

भीषण अपघातात नवविवाहित वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू

Spread the love  जयपूर : एका कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने धडक मारली. या अपघातात पाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *