Wednesday , July 9 2025
Breaking News

देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत आठ वर्षात आठपटीने वाढ

Spread the love

नवी दिल्ली : देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत मागील आठ वर्षांच्या कालावधीत आठपटीने वाढ झाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘बायोटेक स्टार्टअप एक्स्पो’ चे उद्घाटन करताना केले. दोन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील बायोटेक स्टार्टअप्सनी सहभाग घेतलेला आहे.
देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व क्षेत्रांना मजबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. आधीच्या सरकारांकडून काही क्षेत्रांनाच प्राधान्य दिले जात असे. पण या भूमिकेत आमूलाग्र बदल करून आमच्या सरकारने सर्व क्षेत्रांच्या उन्नतीवर भर दिला आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. गत आठ वर्षात देशाची जैव-अर्थव्यवस्था आठपटीने वाढून १० अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ८० अब्ज डॉलर्सवर गेली आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, जैव इकोसिस्टीमच्या क्षेत्रात पुढील काही काळात भारत जगातील १० प्रमुख देशात असेल, असा माझा विश्वास आहे. देशातील स्टार्टअप्सची संख्या आता ७० हजारांच्या वर गेली आहे. यातील काही स्टार्टअप्सनी ६० वेगवेगळे उद्योग स्थापन केले आहेत.
जैव अर्थव्यवस्थेकडे बुद्धीमत्ता आकर्षित होत आहे, ही निश्चितपणे चांगली बाब आहे. बायोटेक क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांची संख्या नऊपटीने वाढली आहे. याशिवाय बायोटेक इनक्युबेटर्सची संख्या सातपटीने वाढली आहे. २०१४ साली देशात ६ बायोटेक इनक्युबेटर्स होते, ही संख्या आता ७५ वर गेली आहे. तसेच बायोटेक उत्पादनांची संख्या १० वरून ७०० वर गेली आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी; १७ जण बेपत्ता

Spread the love  उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *