संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मठ गल्लीतील श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ सद्गुरू संत श्री बाळूमामांंच्या बकरींचे आगमन होताच बाळूमामांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. बगा क्रमांक-१८ गडहिंग्लज औरनाळ, भडगांव मार्गे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ दाखल झाले. संकेश्वरातील भक्तगणांनी सद्गुरू बाळूमामा महाप्रसादाचे आयोजन केले होते. भक्तगणांनी बाळूमामांच्या दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेऊन पुनित होण्याचे कार्य केले. महाप्रसादचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. यावेळी नगरसेविका सौ. श्रीविद्या बांबरे, भरत पटेल, संजय सुतार, राजू सुतार, मल्लू सारवाडी, नेताजी आगम, राजू शिंदे, अमोल दळवी, लखन जाधव, अचानक तरुण मंडळाचे कार्यकर्ते हरगापूर गल्ली, सुतार गल्ली, मठ गल्लीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळूमामांच्या बगा क्रमांक-१८ बरोबर दिड हजार बकऱ्यांचा मुक्काम श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ राहिला. गुरुवार दि. ९ रोजी बाळूमामाच्या बकऱ्यांचा मुक्काम राम क्वळी यांच्या शेतात राहणार असून शुक्रवारी कमतनूर मार्गे बाळूमामांच्या बकऱ्यांचे प्रस्थान होणार आहे.
