Saturday , June 14 2025
Breaking News

अरब देशांविरोधात मोदी सरकार उभे ठाकू शकत नाही, स्वामींचा घरचा आहेर

Spread the love

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी नुपूर शर्मा प्रकरणी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मोदी सरकार अरब देशांविरोधात उभे ठाकू शकत नाही’, अशा शब्दांमध्ये बुधवारी स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. भारत सरकारने इस्त्रायल विरोधात आणि दहशतवादी संघटना ‘हमास’ च्या बाजूने मत दिले आहे.
अफगाण संकटादरम्यान तालिबानसोबत चर्चेसाठी भारत सरकार कतारमध्ये तातकळत होते. दुबईची ओळख मनी लॉन्ड्रिंग स्वरुपातील आहे. दुबईतूनच बीसीसीआयला नियंत्रित केले जाते. अजून काही ऐकायचे आहे का? असा सवाल ट्विटरवरून स्वामी यांनी उपस्थित केला. सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी देखील नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने केलेल्या सहा वर्षांच्या निलंबणाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मोहम्मद पैंगबर यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर देशासह अरब देशांमध्ये प्रकरण तापले आहे. अनेक अरब देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून घेत आक्षेप नोंदवला आहे. ओआयसी, पाकिस्तान व अफगाणिस्तान सारख्या कट्टरतेला प्रोत्साहन देणार्‍या देशांनी देखील या मुद्दयाला तापवत भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, परराष्ट्र मंत्रालयाने सर्वांना योग्य उत्तर दिले आहे. परंतु, भाजप मधूनच शर्मा यांच्या समर्थनार्थ आवाज उठत असल्याने नेतृत्वासमोर पेच प्रसंग उभा ठाकला आहे.

About Belgaum Varta

Check Also

विमान थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू?

Spread the love  अहमदाबाद : विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *