Monday , December 23 2024
Breaking News

मुख्य बातमी

बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ

बेंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणार्‍याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणार्‍यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर …

Read More »

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा 4 हजार रुपये, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी या योजनेची कार्यवाही आज करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अनाथ मुलांच्या बँक खात्यात पीएम केअर्स फंडातून मदतनिधी पाठविला. कोरोनामुळे ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, जी …

Read More »

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना ४ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा आज (दि.२७) ठोठावली. विशेष म्हणजे चौटाला यांनी आजारी असल्याने आणि प्रकरण जुने असल्याने सहानुभूती मागितली होती. दरम्यान, न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना तीन वर्षांपेक्षा जास्त काळ …

Read More »

जम्मू-काश्मीर : २४ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरूच आहेत. याच दरम्यान गुरूवारी (दि. २६) रोजी सकाळी कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. यामुळे गेल्या २४ तासात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि मोठा दारूगोळ्या, इतर …

Read More »

टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली :टेरर फंडिंग प्रकरणात एनआयए कोर्टात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मलिकला किती शिक्षा होणार यावर चर्चा झाली. या प्रकरणी एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी ६ नंतर न्यायालय निर्णय देणार आहे. १९ मे रोजी …

Read More »

लाच मागणार्‍या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतला धडाकेबाज निर्णय

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतलेल्या एका धडाकेबाज निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे. लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने भगवंत मान यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मंत्री विजय सिंगला यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. …

Read More »

ग्राहकांना दिलासा! पेट्रोल ८ तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल ८ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात …

Read More »

भ्रष्‍टाचारप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्‍यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी, २६ रोजी न्‍यायालय सुनावणार शिक्षा

नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्‍यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे उत्‍पन्‍नापेक्षा अधिक मालमत्तेप्रकरणी दोषी ठरले आहेत. याप्रकरणी २६ मे रोजी न्‍यायालय शिक्षा सुनावणार आहे. याकडे हरियाणातील राजकीय वुर्तळाचे लक्ष वेधले आहे. १९९७ मध्‍ये भ्रष्‍टाचार प्रकरणी सिरसा येथे गुन्‍हा दाखल झाला होता. याप्रकरणी २००६ मध्‍ये सीबीआयने गुन्‍हा दाखल केला होता. २०१० …

Read More »

नवज्योतसिंग सिद्धू पटियाला कोर्टात शरण!

अमृतसर: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. आता त्यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागणार असल्याची चर्चा आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर सिद्धू वैद्यकीय तपासणीसाठी पटियाला येथील माता कौशल्या रुग्णालयात गेले. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना काल सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप नेत्यांना विजयाचा नवा मंत्र!

नवी दिल्ली : भाजपने लोकांची विचार करण्याची पध्दत बदलली तरी मुख्य मुद्यांपासून देशाचे लक्ष विचलित करण्याकडे काही पक्षांची सारी ‘इकोसिस्टिम’ काम करत आहे. त्यांच्या जाळ्यात न अडकता व ‘शॉर्ट कट’ न घेता देशासमोरील मुलभूत विषयांच्या सोडवणुकीसाठी व पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला अग्रेसर रहायचे आहे अशा शब्दांत पंतप्रधान …

Read More »