Friday , November 22 2024
Breaking News

खानापूर

जवान संतोष कोलेकर यांना अश्रूनयनांनी अखेरचा निरोप

खानापूर (प्रतिनिधी) : नागुर्डा (ता. खानापूर) गावचे सुपुत्र शहिद जवान संतोष कोलेकर यांचे पूणे येथे रेजिमेंटच्या इस्पितळात रविवारी दि. 19 रोजी आकस्मिक निधन झाले. सोमवारी दि. 20 रोजी पुण्याहून त्यांचा पार्थिवदेह बेळगावला आणण्यात आला. तेथून खानापूर येथील मलप्रभा क्रिडांगणावर आणण्यात आले. यावेळी खानापूर जनतेने दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. तेथून …

Read More »

नागुर्डा येथील जवान संतोष कोलेकर यांचा आकस्मिक मृत्यू

खानापूर : नागुर्डा ता. खानापूर येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे जवान संतोष नामदेव कोलेकर यांचा पुणे येथील रेजिमेंटच्या इस्पितळात रविवार दि.१९ रोजी दुपारी ३ आकस्मिक मृत्यू झाला. कै. नामदेव कृष्णा कोलेकर गुरुजी (मूळचे कौंदल गावाचे) हे संतोष यांचे वडील. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण नागुर्डा येथील मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक …

Read More »

कचरा डेपो प्रकल्पाला चिगुळे गावचा विरोध, निवेदनाद्वारे मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोला कणकुंबी (ता. खानापूर) ग्रामपंचायत हद्दीतील चिगुळे गावच्या ग्रामस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष खाचू गुरव व पीडीओ सुनिल अभारी यांना कचरा डेपो प्रकल्पाला विरोध करत निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे. की, चिगुळे गावची वाढती लोकसंख्या व जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन तसेच याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या …

Read More »

गणेशोत्सवनिमित्त तोपिनकट्टीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, श्रीमहालक्ष्मी ग्रुपवतीने शर्यतीचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवनिमित्त मौजे तोपिनकट्टीत (ता. खानापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व श्रीमहालक्ष्मी ग्रुपवतीने शनिवारी संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते बैलगाडी हाकुन शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले.प्रारंभी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमेद कोचेरी, माजी जि. प. सदस्य जोतिबा रेमाणी, बाबूराव देसाई, चांगापा निलजकर, मल्लापा मारीहाळ आदीच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात …

Read More »

बेकवाडमध्ये कोरोना योद्ध्यांचा भव्य सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड तालुका खानापूर येथील कार्यक्षेत्रातील अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालीकोटी, महिला व बालविकास अधिकारी राममूर्ती के. व्ही., तालुका वलय अधिकारी सुनंदा यमकनमर्डी, तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे, बिडी आरोग्य …

Read More »

ओलमणीजवळ श्रीरामसेनेकडून गोव्याला जाणाऱ्या गाईंची सुटका

खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी ता. खानापूर जवळ श्रीराम सेनेकडून गोव्याला घेऊन जाणाऱ्या गाईंची सुटका करण्यात आली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गाईंनी भरलेला तामिळनाडूतून गोव्याला जाणारा टीएन ५२ एफ ४४५० क्रमांकाचा ट्रक ओलमणी गावाजवळ श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते किरण साबळे, विनायक साबळे, परशराम पवार, परशराम चव्हाण, प्रकाश तोराळकर, प्रशात साबळे, मारूती …

Read More »

बाळगुंद गावाला जोडणारा रस्ता मार्गी लावा

बैठकीत नागरीकांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : बाळंगुद तालुका खानापूर येथे गुरुवारी हिंदू धर्म जनजागृती व विकास योजना मार्गी लावण्यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी खानापूर तालुका भाजपा नेते पंडित ओगले उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी बाळगुंद गावाला जोडणार्‍या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देतााना …

Read More »

बेकवाड येथे पौष्टिक आहार शिबिर संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड तालुका खानापूर येथे गुरुवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मराठा मंडळ हायस्कूल बेकवाड येथील सभागृहात तहसील कार्यालय, बालविकास व महिला शिष्य अभिवृध्दी व तालुका आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक आहार शिबीराचे आयोजन पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव होते. …

Read More »

पंतप्रधान मोदीच्या वाढदिवसानिमित्त खानापूरातून पत्राव्दारे शुभेच्छा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने शुक्रवारी दि. 17 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवासाचे औचित्य साधुन खानापूर येथील रेल्वे स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिसमधून खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आदीनी पोस्ट पत्राव्दारे शुभेच्छा पाठविल्या. यावेळी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते …

Read More »

खड्ड्यामुळे गर्लगुंजी-नंदिहळ्ळी रस्त्याची दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासुन ते नंदिहळ्ळी गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होत आहे. त्याचबरोबर खानापूर-गर्लगुंजी-नंदिहळ्ळी बससेवाही रस्त्याची दुर्दशा झाल्याने व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने सुरळीत धावत नाही. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक …

Read More »