Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील तेरावी विद्यार्थीनी लष्करात दाखल!

  बेळगाव : “माझ्या काॅलेमध्ये एकमेकांना भेटताना जय हिंद हा नारा दिला जातो आणि तेच माझ्या यशाचा प्रेरणास्थान आहे!” असे गौरवोद्गार कुमारी विकीता विष्णू गावडे या विद्यार्थिनीने सत्कार प्रसंगी काढले. “देशाचे आम्ही शुर शिपाई”, “आम्ही कोणा भिती नाही”, “पाऊल आमचे पुढेच जाई”, ” भीतीची तर मुळीच बाधा नाही!” याचे बाळकडू …

Read More »

कणकुंबी येथील एका रिसॉर्टमध्ये खासबाग येथील तरुणाचा बुडून मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. महांतेश गुंजीकर (वय 27), खासबाग बेळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलसानी दिलेली माहिती अशी की, मृत हा एलजी कंपनीचा कर्मचारी असून शनिवारी सायंकाळी एलजी कंपनीच्या बेळगाव शाखेतील …

Read More »

मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे स्नेहमेळाव्यानिमित्त आठवणींचा अभूतपूर्व जागर!

  बेळगाव : “स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कतृत्व आणि स्त्री म्हणजे नेतृत्व असते ज्या घरातील स्त्री सुरक्षित असते ते कुटूंब संस्कारात असते, एका स्त्रीने शिक्षण घेणं म्हणजे एका घरांने पर्यायाने एका कुटुंबाने शिक्षण घेऊन संस्कारात होणे असा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्री भाग्यविधाता स्थानी आहे, तिच्या पंखात …

Read More »

मराठा मंडळाच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा भव्य स्नेहमेळावा दिनांक 28 डिसेंबर रोजी

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवून समाजातील वंचित आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरविण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालीन अध्यक्ष माननीय कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवी पूर्व महाविद्यालय सन 1992 -93 मध्ये …

Read More »

खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबित

  खानापूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी …

Read More »

खानापूर भूविकास बँकेच्या 13 संचालकांची बिनविरोध निवड; दोन जागांसाठी 28 रोजी मतदान

  खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक 15 संचालकांपैकी 13 संचालकांची बिनविरोध निवड रविवारी पार पडली. परंतु कक्केरी व गर्लगुंजी या दोन जागांवर एकमत न झाल्याने या दोन जागांसाठी 28 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. खानापूर भूविकास बँकेचे माजी चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची सलग चौथ्यांदा संचालक पदी …

Read More »

मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे

  खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित होते. माणसाच्या मेंदूचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होते. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे प्रा. रंगनाथ पठारे यांनी स्पष्ट केले. शिवस्वराज फाऊंडेशन आणि गुंफण साहित्य अकादमीतर्फे …

Read More »

खानापूरात उद्या विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

  खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व गुंफण साहित्य अकादमीतर्फे खानापूर येथील लोकमान्य भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वर मंदिर येथून ग्रंथ दिंडीला सुरवात होणार आहे. तसेच ग्रंथ दिंडीच्या मार्गावर भगव्या पताका व भगवे ध्वज लावून परीसर भगवामय …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांची तीन दिवशीय शैक्षणिक रवाना!

  खानापूर : सहल हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग असतो. सहल म्हणजे विद्यार्थी जीवनातील रोमहर्षक अनुभव असतो. मराठा मंडळ शिक्षण संस्था अभ्यासाबरोबर कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांना महत्त्व देणारी शिक्षण संस्था असल्याने अशा शैक्षणिक उपक्रमांना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू या नेहमीच प्राधान्य व प्रोत्साहन देत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी …

Read More »

खानापूरात रविवारी रंगणार गुंफण साहित्य संमेलन!

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) खानापूर येथील लोकमान्य भवन आयोजित करण्यात आलेल्या गुंफण सदभावना मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. तसेच संमेलनाला महाराष्ट्र, गोवा व सीमाभागातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. त्यामूळे अनेक ठिकाणी फलक लावण्यासह पताका व …

Read More »