Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर

नंदगड येथे क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या भव्य पुतळ्याचे आणि संग्रहालयाचे सोमवारी उद्घाटन

  माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश खानापूर : नंदगड (ता. खानापूर) येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या भव्य पुतळ्याचे आणि आकर्षक संग्रहालयाचे उद्घाटन येत्या १९ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास मंत्रिमंडळातील सुमारे अनेक दिग्गज मंत्री उपस्थित राहणार आहेत. सिद्धरामय्या …

Read More »

हलगा (खानापूर) ग्रामस्थांच्या वतीने हलशी येथे श्री महालक्ष्मी देवीला ओटी अर्पण; उद्या भव्य कार्यक्रम

  हलगा : “हलगा माहेर… मेरडा आजोळ… आणि हलशी सासर” ही केवळ शब्दरचना नसून पिढ्यान्‌पिढ्या जपलेली श्रद्धा, परंपरा आणि भावनिक नाळ आहे. याच परंपरेनुसार शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी हलगा गाव पंचकमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने हलशी येथील श्री महालक्ष्मी देवीला ओटी (आहेर) अर्पण करण्याचा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात …

Read More »

गर्लगुंजी- बेळगाव बससेवा पुन्हा सुरू; शाळा, कॉलेज मुलांचा आणि कामगारांचा प्रश्न सुटला

  खानापूर : बेळगाव येथे सकाळी 8 च्या वेळेत असणाऱ्या शाळा कॉलेज आणि कामगार लोकांना बसच्या गैरसोयीमुळे अडचण निर्माण झाली होती. यापूर्वी गर्लगुंजी गावाची बस व्यवस्था खानापूर आणि बेळगाव येथे जाणाऱ्या येणाऱ्या बसेस सुरळीत होत्या. नंतर बेळगाव येथे सकाळी जाणारी बस तोपिनकट्टीपर्यंत जाऊ लागली, त्यामुळे कामगार वर्ग विद्यार्थी याना वेळेत …

Read More »

नंदगड बाजारपेठेत हुतात्मादिनाची खानापूर समितीची जागृती

  खानापूर : 1956 साली स्वतंत्र भारतात भाषांवर प्रांतरचना करतांना तात्कालीन केंद्र सरकारने अन्यायाने 40 लाख मराठी बहुभाषिकांना त्या वेळच्या म्हैसूर प्रांतात म्हणजेच आत्ताचे कर्नाटक यामध्ये डांबल्याच्या निषेधार्थ सीमाभागासह मुंबई प्रातांत म्हणजेच आत्ताच्या महाराष्ट्रात आंदोलन छेडले गेले या आंदोलनात अनेक हुतात्मे झाले त्या मध्ये खानापूर तालुक्याचे कै. नागाप्पा होसुरकर हे …

Read More »

मरगाळे व गीरी बेमुदत उपोषण : रोडचा फेर सर्वे करण्याचे आदेश

  खानापूर : आज दुपारी कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. घाडी साहेबांनी तहसिलदार व एडीएलआर यांना खानापूर शहरातील रोडचा फेर सर्वे करण्याचे निवेदन दिले आणि संध्याकाळी लगेच तहसिलदार यांनी मोजणीचे आदेश दिले व एडीएलआर यांनी उद्या सकाळी ९.३० वाजता खानापूर शिवस्मारक चौक ते जांबोटी सर्कल पर्यंतचा सर्वे करण्यासाठी नोटीस काढल्या. शेवटी …

Read More »

हुतात्मादिनी बहुसंख्येने उपस्थित राहा : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत आवाहन

  खानापूर : 17 जानेवारी हुतात्मा दिनी गांभीर्याने पाळण्यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती, बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला मधल्या काळात …

Read More »

हलशीत तरुणावर टोळक्याकडून हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशी।येथे गैर समजातून एका तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीद महम्मद देवडी याला किरकोळ कारणामुळे मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये देवडी हा जखमी झाला असून, त्याला बेळगाव येथील …

Read More »

आकडी पोटात घुसून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; खानापूर तालुक्यातील घटना

  खानापूर : गवत आणण्यासाठी गेलेला शेतकरी गवताच्या गंजीवरून पाय घसरून खाली पडल्याने त्याच्या हातातील आकडी पोटात घुसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मोहिशेत (ता. खानापूर) येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे. कृष्णा गोविंद मिराशी (45) असे जीव गमावलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा मिराशी अन्य शेतकऱ्यांसोबत …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी हुतात्मादिन पाळण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तरी म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी वेळेत उपस्थित …

Read More »

जांबोटी विद्यालयाच्या वैभवात संगणक दालनाची भर; जांबोटकर प्रतिष्ठानचा उपक्रम

  जांबोटी (ता. खानापूर) : येथील विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयात संगणक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. किशोर गणपती जांबोटकर संस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या संगणक दालनाची उभारणी करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या जांबोटी …

Read More »