Wednesday , July 29 2026
Breaking News

मराठी शाळांतील कन्नड सक्तीविरोधात खानापूर तालुका समितीच्या वतीने सोमवारी क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता शिवस्मारक येथे २२ जून रोजी कन्नडसक्ती विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटायची आहेत तसेच माडीगुंजी येथील शाळेत होऊ घातलेल्या कर्नाटक पब्लिक स्कूलमधील कानडीकरणाविषयी क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे ठरले आहे. तरी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे. तसेच सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देण्यात येणाऱ्या एक लाख सह्यांचे पुस्तक संबंधित कार्यकर्त्यांनी आणावे. तसेच जनजागृती पत्रके मंगळवार दिनांक १६ जून रोजी जांबोटी येथे तर १७ जून रोजी नंदगड येथे वाटण्यात येणार आहे. तरी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे आणि जनजागृती यशस्वी करावी असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीतर्फे इदलहोंड आणि गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप; मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार

Spread the love  खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *