Saturday , June 13 2026
Breaking News

म्युनिसिपल हायस्कूल मैदान बनले वाहन पार्किंगचा अड्डा

Spread the love

 

खेळाडूसह नागरिकांची गैरसोय ; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

निपाणी (वार्ता) : शहर व नगरपालिकेच्या इतिहासात म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानाला महत्त्वाचे स्थान आहे. १८५४ मध्ये निपाणी नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर या मैदानाचा वापर राजकीय सभा सार्वजनिक कार्यक्रम, विविध खेळ व सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून या मैदानाला आजही तितकेच महत्त्व असताना सध्या या मैदानाव विविध प्रकारच्या वाहनासह अवजड वाहनांचे पार्किंग करण्यात येत असल्याने शहरातील क्रिकेट प्रेमीसह इतर खेळाडू मधून तीव्र नाराजी पसरली आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ संबंधित वाहनधारकावर कारवाईने केल्यास आंदोलन करण्याचा इशारा खेळाडूंनी दिला आहे.
शहर आणि उपनगरातील अनेक विद्यार्थी, युवक ज्येष्ठ नागरिक विविध खेळासह व्यायाम करण्यासाठी या मैदानावर सकाळ, सायंकाळी येत असतात. क्रिकेट खेळताना बॉलमुळे वाहनांच्या काचा फुटण्याचा इतर घटना घडल्यास खेळाडूंना जबाबदार धरण्यात येते. त्यामुळे खेळायचे कुठे असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे.
मैदान परिसरात परिसरातील गॅरेज मधील वाहने देखील मैदानाच्या एका बाजूला लावण्यात येतात. गॅरेज व्यवसायिकांना याबद्दल सांगूनही तेथून गाड्या हलवण्यात आलेल्या नाहीत. याव्यतिरिक्त मैदानावर लावण्यात येणाऱ्या अवजड वाहनांच्या मालक व चालकांना मैदानावर वाहने पार्किंग न करण्याबाबत सांगितले आहे. तरीही वाहने लावण्यात येत आहेत. याशिवाय नगरपालिका अधिकाऱ्यांना कळवून देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित वाहनधारकावर कारवाई करावाई करण्याची मागणी
माजी नगरसेवक मज्जिद सय्यद यांनी केली आहे.
यावेळी उद्योजक अमित खराडे, राजू नाईक, अमित पाटील, मुबारक पटेल, महेंद्र सूर्यवंशी, रमेश शिंदे, नजीर टीनमेकर, किशोर लांडगे, लियाकत नगारजी, प्रशांत भाट, वासिम साडी वाला, मुदूसर नदाफ, झाकीर देसाई, यांच्यासह झुंजार व टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबचे आजी माजी खेळाडू उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पाऊस वारा येताच बत्तीगुल

Spread the love  पावसाळापूर्व कामावर प्रश्नचिन्ह; दररोज तीन तासापेक्षा अधिक वेळ वीज गायब निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *