खानापूर : येत्या २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कन्नडसक्ती विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आज मंगळवार दिनांक १६ जून रोजी जांबोटी बाजारपेठमध्ये मोर्चाच्या जनजागृतीसाठी जागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. हजारोंच्या संख्येने २२ जूनच्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात भाग घेऊन हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले. जागृती फेरी वेळी या भागातील माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजाराम देसाई, डीएम भोसले गुरुजी, विठ्ठलराव देसाई, रवींद्र शिंदे, विठ्ठल गुरव, नाईक, राजू चिखलकर, शंकर सडेकर, प्रभाकर बिरजे, सुधीर पाटील, वसंत नावलकर, कृष्णा गावडे, हणमंत जगताप, इत्यादी मंडळींनी जनजागृतीमध्ये पत्रक वाटून जागृती केली.
Belgaum Varta Belgaum Varta