Monday , August 17 2026
Breaking News

पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस नेत्या आयेशा सनदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

 

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या तरुणाच्या बाजूने उभे राहत पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या आयेशा सनदी यांच्याविरोधात शहरातील माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, खानापूर येथील बद्रुद्दीन किल्लेदार याने विवाहाचे आश्वासन देत संबंधित युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आयेशा सनदी यांनी पीडितेला त्रास देत तिचे खासगी व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या कथित छळाला कंटाळून पीडित युवतीने गेल्या मंगळवारी गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी युवतीच्या पालकांनी माळमारुती पोलीस ठाण्यात बद्रुद्दीन किल्लेदार आणि आयेशा सनदी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

तक्रारीनुसार, युवतीने संबंधित तरुणाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तसे करू नये, अन्यथा तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर प्रसारित केले जातील, अशी धमकी दिल्याचा आरोप आयेशा सनदी यांच्यावर करण्यात आला आहे.

युवतीच्या पालकांनी केलेल्या आरोपांनुसार, संबंधित तरुणाने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तसेच तिचे खासगी फोटो जतन करून ठेवले. याशिवाय, काही प्रभावशाली व्यक्ती आणि पोलिसांमध्ये ओळख असल्याचा दावा करत युवतीवर दबाव आणण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या कथित धमक्या आणि मानसिक छळामुळे युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी शाळांना डावलाल तर गप्प बसणार नाही!

Spread the love  शिक्षक भरतीत मराठी माध्यमासाठी जागांची मागणी; खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उद्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *