खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांचा 67 वा वाढदिवस शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाला. श्री. गोपाळ देसाई यांचे बालपण कष्टात गेले. इच्छा असून देखील घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर भारतीय सैन्य दलात दाखल होऊन गोपाळ देसाई यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून …
Read More »“बापू गेले…”; अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी व्यक्त केल्या भावना
मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर राहिलं तर शहाणं होणार नाही म्हणून हेमंतला कोल्हापूरात ठेवला पाहिजे! जीजी बापूनं ह्रदयावर दगड ठेवला अन् नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकलेल्या आपल्या पहिल्या अपत्याला आपल्या बहिणीकडं मला सोडलं. का तर याच मोठ्या बहिणीनं बापूंना ही शिकवून शहाणं …
Read More »रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी खानापूर-जांबोटी मार्ग आजपासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बेळगाव : खानापूर-जांबोटी रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गुरुवार, दि. ३० एप्रिल ते ५ मे पर्यंत असे सहा दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत. या काळात खानापूरहून येणारी वाहने पिरनवाडी, कुसळी, जांबोटी रोडवरून वळविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. …
Read More »दहावीमध्ये राज्यात दुसरा आलेल्या झुंजवाड येथील दिव्या देसाईचा शिवस्वराज संघटनेतर्फे सत्कार
खानापूर : राज्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणे ही खानापूर तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असून दिव्या देसाई हिने पुढील शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत चांगली कामगिरी करावी असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तसेच शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी केले आहे. दहावी परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेल्या …
Read More »गर्लगुंजी माऊली देवी यात्रा काळात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
विद्यार्थी व कामगारांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा खानापूर : गर्लगुंजी येथील श्री माऊली देवी यात्रा काळात तसेच यात्रेनंतरही बेळगाव–गर्लगुंजी आणि खानापूर–गर्लगुंजी या मार्गांवरील बसफेऱ्या वाढवाव्यात व सुरू असलेल्या बससेवा सुरळीत ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर बेळगाव–गर्लगुंजी व खानापूर–गर्लगुंजी मार्गांवर बससेवेमध्ये अनियमितता निर्माण …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी राजा शिव छत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक 11 वाजता बोलवण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »गणेश मंडळ देसाईवाडा (तिओली) ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान
खानापूर : शुक्रवार दिनांक 24 रोजी तिओली (देसाई वाडा) येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गणेश मंडळ देसाईवाडा आणि ग्रामस्थांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सरचिटणीस …
Read More »पावसापूर्वीच तालुक्यातील सर्व विद्युत दुरुस्ती कामे पूर्ण करा; यात्रा काळात वीज सुरळीत द्या
खानापूर : ऐन पावसाळ्यात बऱ्याच वेळा वीज दुरुस्ती कामासाठी काढली जाते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी विद्युत ताराना लागणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि इतर अडचणी च्या ठिकाणचे पार्ट बदलने ही सर्व कामे आताच आवरून घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यात लोकांना अंधारात राहण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही तसेच गर्लगुंजी …
Read More »गाऊन घालण्याच्या वादातून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न: पतीला अटक
खानापूर : गाऊन घालण्यावरून झालेल्या वादातून पत्नीला पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नंदगड पोलिसांनी अटक केली आहे. खानापूर तालुक्यातील करजगी गावच्या रहिवासी श्रीमती संतोषी नारायण भातखांडे (55) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 19 एप्रिल रोजी रात्री बेळगावच्या बिम्स रुग्णालयात जाऊन तक्रार दिली, त्यानंतर नंदगड पोलीस …
Read More »श्री नागेश महारुद्र मंदिर कळस शोभायात्रा भक्तिमय वातावरणात
खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री नागेश महारुद्र मंदिराच्या कळसाची भव्य शोभायात्रा सोमवार, दि. २० एप्रिल रोजी मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. परिसरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कळस व देवमूर्तींचे दर्शन घेतले. देसाई गल्लीतील निरंजन सरदेसाई यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta