Monday , September 21 2026
Breaking News

सीमावासीयांचा आशेचा किरण काळाच्या अंधारात हरवला; खानापूर समितीच्या वतीने श्रद्धांजली

Spread the love

 

खानापूर : अजितदादांना आपण सर्वजण जनतेचा नेता, प्रशासनावर घट्ट पकड असलेले आणि शिस्तीचे नेते म्हणून ओळखतो. आदरणीय श्री. शरद पवारांच्या सावलीत तयार झालेला हा नेता काकांच्या पावलावर पाऊल ठेवून सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. २००९ साली आझाद मैदानावर झालेल्या सीमवासीयांच्या आंदोलनात सहभागी झाले होते, २०२४ साली दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी सीमावासीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करणार होते पण ही बाब लक्षात येताच माननीय अजितदादा यांनी समिती नेत्यांना विनंती केली की समितीनेत्यांनी धरणे आंदोलन करू नये आणि साहित्य संमेलनात सहभागी व्हावे आणि आश्वासन दिले की ते स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. दिलेल्या शब्दाप्रमाणे अजितदादांनी संमेलनानंतर मुंबईत सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलावली होती. अजितदादा प्रत्येकवेळी समिती नेत्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे, माननीय श्री. शरद पवारांच्या नंतर सीमावासीयांसाठी एक आशेचा किरण होते अजितदादा, आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह संपूर्ण सीमाभाग पोरका झाला आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *