Friday , April 17 2026
Breaking News

हलशीवाडीत २५ एकरांतील ऊस खाक

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुक्यातील हतशीवाडी येथे शनिवारी उसाला आग लागून २५ एकरांतील ऊस खाक झाला. यावेळी शिवारात ठेवलेले पाईप, स्प्रिंकलर व पंपसेटच्या केबल पूर्णपणे जळाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्स तोडणीची कामे परिसरात सुरू आहेत. मात्र, गावातील वहिले शेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील उत्स तोडणी बाकी होती. येथे दुपारी दीडच्या सुमारास लागलेल्या आगीत २५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. शिवारात दुपारच्या सुमारास अचानक धूर निघताना दिसला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. उन्हाची तीव्रता, कोरडी हवा आणि वाऱ्याचा वेग
यामुळे आग वेगाने पसरली. शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात आणणे कठीण झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ एकवटले, मात्र काही वेळातच आग अनेक शेतकऱ्यांच्या शिवारात पसरली. त्यामुळे आगीवर नियंत्रण ठेवता आले नाही. यात मत्यप्पा देसाई, कृष्णाजी
देसाई, सुरेश देसाई, सुभाष देसाई, केशव देसाई, लव देसाई, नरसिंग देसाई, अशोक देसाई, महादेव देसाई यांच्या शिवारातील उसाचे नुकसान झाले. त्यांना लाखो रुपयांचा फटका बसता आहेत.
या आगीमागचे नेमके कारण अवाप स्पष्ट झालेले नाही. मात्र, उसाला आग लागण्याच्या घटना अधिक प्रमाणात वाढू लागल्याने शिवारात अशा घटना घडणार नाहीत, याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच जळालेल्या उसाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत न केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. उसाला आग लागल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर ह्लशीचे तलाठी गणेश रोष्ट्टी यांनी शिवारात जाऊन पंचनामा केला. यावेळी माणिक देसाई, रवी देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *