Monday , June 1 2026
Breaking News

मराठा मंडळ ताराराणी हायकूल खानापूरमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती व शारीरिक शिक्षण दिन साजरा

Spread the love

 

खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल खानापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व शारीरिक शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल एन. जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सागर देशपांडे ॲडिशनल कमिशनर- केंद्रीय दक्षता आयोग-कर्नाटक व गोवा विभागप्रमुख तसेच श्री शिवाजीराव पाटील, संचालक, मराठा मंडळ बेळगांव, श्री गुलाप्पा बी. होसमनी, माजी बुडा चेअरमन व प्रेसिडेंट, बेळगांव जिल्हा हॉकी फेडरेशन. श्री सुधाकर चळके- सेक्रेटरी, बेळगाव जिल्हा हॉकी फेडरेशन. श्री उत्तम शिंदे निवृत्त कॅप्टन व बेळगाव जिल्हा हॉकी फेडरेशनचे प्रशिक्षक, श्रीमती सविता वेसणे सदस्य, बेळगांव जिल्हा हॉकी फेडरेशन व म. मं. ताराराणी पि.यु. कॉलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी टी. पाटील यांनी केले व विद्यार्थिनींना शारीरिक शिक्षण दिनाचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय श्री.पी. एल. तरळे यांनी करून दिला.
प्रमुख पाहुणे डॉक्टर सागर देशपांडे यांनी विद्यार्थिनींना आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आई-वडिल व शिक्षकांचे आशीर्वाद व मार्गदर्शन तसेच शिस्त व खेळातून मिळणारी जिद्द आयुष्यभर साथ देते. यशासाठी अपयश पचवण्याची कला, सातत्य आणि आत्मविश्वास या गुणांची पायाभरणी शारीरिक शिक्षणामधून होते असे सांगत विविध स्पर्धा परीक्षा विषयी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कॅप्टन श्री. उत्तम शिंदे यांनी मुलींच्या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. विद्यार्थिनींना दर्जेदार सुविधा, क्रीडा साहित्य व प्रोत्साहन मिळावे यासाठी आपण नेहमी सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन दिले.
या प्रसंगी ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पथसंंचलन, एम.डी. प्रकार, सर्वांग सुंदर व्यायाम, बैठे प्रकार, लेझीम नृत्य, योगा, पिरॅमिड, एरोबिक्स अशा विविध कवायतीच्या प्रकाराचे नेञदिपक प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एल. आर. पाटील आणि श्रीमती मंगल एस. पाटील यांनी केले. श्री व्ही. एस. मुन्नोळकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *