Sunday , July 26 2026
Breaking News

मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Spread the love

 

कैवल्ययोग आश्रम- कुसमळी, जांबोटी रोड येथे मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमानिमित्त वार्षिक सहल व संक्रांतीचे हळदीकुंकू असे आयोजन करण्यात आले होते.
विजापूरचे डाॅक्टर प्रशांत कटकोळ यांनी या निसर्गरम्य परिसरात या आश्रमाची उभारणी केली. ध्यान धारणा व योगसाधना सुलभतेने व्हावी या हेतूने ‘प्रशांत कुटीर’ची निर्मिती केली. तेथे राहण्याचीही उत्तम सोय आहे. या ठिकाणच्या एक दिवसाच्या भेटीतही जवळजवळ एक वर्षाची उर्जा मिळते. अशा या शांत, प्रशस्त व निसर्गरम्य ठिकाणी भेट दिल्याने खुप छान माहिती मिळाली.
दिवसभरच्या कार्यक्रमात मागील वर्षीच्या कार्यकारिणीतील मावळत्या अध्यक्षा अस्मिता आळतेकर, सेक्रेटरी दीपा बापट, खजिनदार सुखद देशपांडे यांनी नुतन कार्यकारिणी सदस्य निवडीची घोषणा केली. अध्यक्ष-उमा संगाई, उपाध्यक्ष-अपर्णा वेलंगी, खजिनदार-कल्पना पाटील, सेक्रेटरी- शीला संपकाळ
अशी नुतन कार्यकारिणी जाहीर झाली.

गेममधील विजेत्या मैत्रिणींना बक्षिसे देण्यात आली. साठ वर्षांवरील जवळजवळ अठरा मैत्रिणींचा सन्मान करण्यात आला. सेक्रेटरी दीपा बापट यांनी मागील वर्षातील घडामोडींचा आढावा घेऊन अहवाल सादर केला. सुग्रास भोजनानंतर गप्पाटप्पा, कवितावाचन, गाण्यांची मैफिल असा सुंदर कार्यक्रम रंगला. एकुणच मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन वार्षिक सहल व संक्रांतीचे हळदीकुंकू या निमित्ताने आश्रमाच्या निसर्गरम्य परिसरात उत्साहात रंगला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *