Friday , April 17 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन आज शनिवारी व्ही. एन्. शिवनगी कन्या विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मुख्याध्यापिका मीनाक्षी वडेर यांनी स्वागत केले.
भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे प्रास्ताविक करताना म्हणाले, राष्ट्रीय बालिका दिवस मुलींच्या हक्कांविषयी, सुरक्षिततेविषयी आणि शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा दिवस आहे, जो समाजात समानता आणण्यासाठी आणि मुलींना सशक्त बनवून उद्याचा प्रगत भारत घडवण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस मुलींचे समाजातील स्थान आणि आत्मविश्‍वास वाढवण्याचा संकल्प करतो.
भाविप राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी बोलताना सांगितले की, आदर्श महिला व्यक्तिमत्त्व म्हणजे संयम, शिक्षण, चारित्र्य आणि कर्तृत्वाचा सुरेख संगम होय. संकटात धीर न सोडणारी, नाती जपणारी, स्वावलंबी आणि कुटुंबाला आनंदी ठेवणारी स्त्री खऱ्या अर्थाने आदर्श ठरते. जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा वारसा, सोबतच शिक्षणाने सक्षम झालेली स्त्री समाजाला दिशा देते, असे सांगितले.
त्यानंतर भारत विकास परिषदेतर्फे विद्यार्थिनींसाठी भारतातील अनन्यसाधारण आदर्श महिलांवर आधारित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. भाविप प्रांत संघटन सचिव विनायक घोडेकर व डी. वाय. पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्का जुवेकर यांनी केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *