Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर

शिवजयंतीचे औचित्य साधत आरोग्य भारती खानापूर शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ. डी. ई. नाडगौडा

  खानापूर : अखंड हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (दि. 19 फेब्रुवारी 2026) आरोग्य भारती, खानापूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडली. सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवजयंतीच्या प्रेरणेतून आयोजित या सभेत रक्तदान, मोफत आरोग्य …

Read More »

छ. शिवरायांना गांभिर्याने अभ्यासावे लागेल : प्राचार्य अरविंद पाटील

  मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून छ. शिवजयंती उत्साहात साजरी खानापूर : छ. शिवरायांनी केवळ युध्दनीतीला महत्व दिले नाही तर समाज परिवर्तनाचा विचार दिला आहे. आजची परिस्थिती पाहता आज समाजाला केवळ शिवरायांच्या शौर्यगाथांची नव्हे, तर विचारांची नितांत गरज आहे. आजची विदारक परिस्थिती पाहता शिवरायांना गांभार्याने अभ्यासावे लागेल, असे प्रतिपादन म. मं. ताराराणी …

Read More »

जटगे गावात समाजोपयोगी उपक्रम; बसस्टॉप शेड व मंदिर प्रवेशद्वार कमान उभारणी

  जटगे : गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे येथील काही युवकांनी पुढाकार घेत बसस्टॉप शेडची उभारणी केली आहे. उन्हाळा व पावसाळ्यात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमातून युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. याचबरोबर आपल्या गावचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर …

Read More »

खानापुरात रविवारी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा

  मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलमध्ये होणाऱ्या या परीक्षेला खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने …

Read More »

मौजे खैरवाडच्या मातीतून जागतिक नेतृत्वापर्यंतची थक्क करणारी झेप……!

  खानापूर : नंदगड शेजारील खैरवाड या छोट्याशा खेड्यात जन्मलेला एक जिद्दी विद्यार्थी आज जागतिक उद्योगविश्वात मानाचे स्थान मिळवतो, ही संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी अभिमानाची बातमी आहे. परशराम कोलेकर यांची Stellantis या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग… इंडिया अ‍ॅण्ड पॅसिफिक या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर नुकतीच नियुक्ती जाहीर झाली आहे. …

Read More »

पंचहमी योजनांतर्गत खानापूर तालुक्यात ५०० कोटींचा लाभ : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे खानापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत आत्तापर्यंत साधारणपणे ५०० कोटी रुपये पोहोचल्याची माहिती आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी दिली. काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या उन्नतीसाठी पंचहमी योजना प्रभावीपणे राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात सुमारे १००० दिवसांत पंचहमी …

Read More »

खानापूर -पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी दुसऱ्या टप्प्यातील सर्वे 16 आणि 17 फेब्रुवारीला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर -पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यांचे सीमांकन अर्थात सर्वे प्रक्रियेचा दुसरा टप्पा 16 आणि 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भू दाखले सहाय्यक संचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या सर्वे अंतर्गत खानापूर शहरातील सर्वे क्रमांक 41, 42, 101, 103, 104 त्याचप्रमाणे खानापूर …

Read More »

खानापूर : समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड

  खानापूर : खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. नाडगौडा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कर्नाटक गव्हर्नमेंट रिकनाईज्ड नेटबॉल असोसिएशन, दावणगिरी यांच्या वतीने आयोजित अंडर 19 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी …

Read More »

वडैबैल येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिर जीर्णोद्वार; चौकट पूजन, माहेरवाशीयांचा सत्कार सन्मान कार्यक्रम

  खानापूर : श्री महालक्ष्मी मंदिर वडैबैल कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी गावामध्ये सहवाद्य चौकट मिरवणूक व श्रींचे विधिवत आरती-पूजन असा दिवसभराचा भक्तिभावपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी श्री चव्हाटा मंदिर येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक इंगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न …

Read More »

गुंजी येथे ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 स्पर्धेचे आयोजन

  गुंजी (प्रतिनिधी : संदीप घाडी) : गुंजी, ता. खानापूर येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गाव स्वच्छता, कर भरणा, ग्रामविकास तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाती जयकुमार गुरव, अध्यक्षा ग्रामपंचायत …

Read More »