Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर शिवाजीनगर दुचाकी अपघातातील मृताची संख्या दोन

  खानापूर : काल सायंकाळी खानापूर जांबोटी मार्गावरील शिवाजी नगर रेल्वे पुलावर काल शुक्रवारी दोन दुचाकींचा अपघात होऊन, यामध्ये रामगुरवाडी गावचा शंकर धाकलु गुरव जागीच ठार झाला होता. तर त्याचा काका रवळू गुरव व नागुर्डा येथील दुचाकीस्वार अमोल खोबान्ना पाखरे, हे दोघे जखमी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना बेळगाव …

Read More »

खानापूर – जांबोटी मार्गावर दोन दुचाकींचा अपघात; एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजीनगर रेल्वे पुलावर दोन दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये एक जागीच ठार झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नागुर्डा येथील अमोल खोबान्ना पाखरे (वय …

Read More »

खानापूर येथे २२ डिसेंबर रोजी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनाला अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी उपस्थित राहणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गुंफण साहित्य परिषद महाराष्ट्रासह सीमा भागातील विविध गावांमध्ये मराठी साहित्य संमेलन घेत …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी महत्वपूर्ण बैठक

  खानापूर : १ नोव्हेंबर काळ्या दिनासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेंव्हापासून १ नोव्हेंबर हा संपूर्ण …

Read More »

मेरडा गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी

    तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली हलगा पंचायत ग्राम विकास अधिकाऱ्याला सूचना खानापूर : मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड कोठे गेले याची सखोल चौकशी करावी तसेच 2014 ते 2024 पर्यंतच्या लेखा परीक्षणाचा अहवाल देण्यात यावा अशी स्पष्ट सूचना तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी …

Read More »

होनम्मा देवी तलावात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

  खानापूर : खानापूर-यल्लापूर राज्य महामार्गावरील कसबा नंदगड येथील होनम्मा देवी तलावात काल एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खानापूर तालुक्यातील गरबेनहट्टी येथील गिरीश बसवराज तलवार (वय 14) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी दीडच्या …

Read More »

उद्या आमदारांच्या हस्ते होणार खानापूर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन..

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये, महात्मा गांधी ग्रे वॉटर मॅनेजमेंट योजनेतून मंजूर झालेल्या, 3,45,78,000. (3 कोटी 45 लाख 78 हजार) रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते उद्या मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. पारीश्वाड या ठिकाणी 99 लाख 49 हजार रुपयाच्या योजनेचे …

Read More »

“मातृभाषा शाळा अभियान” संदर्भात सर्व भाषिकांची 27 रोजी एकत्रित बैठकीचे आयोजन

  खानापूर : तालुक्यातील सर्व मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकवणे व वाचवणे या संदर्भात “मातृभाषा शाळा अभियान” राबविण्यात येत असून रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता खानापूर येथील श्री शिवस्मारक सभागृहात तालुक्यातील सर्व भाषिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शाळांच्या एसडीएमसी कमिटीचे पदाधिकारी, …

Read More »

कंटेनर – दुचाकीचा भीषण अपघात : विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळील आमटे गावाजवळ कंटेनर व दुचाकीच्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव निखिल बाबागौडा पाटील (१९) असे असून तो चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील रहिवासी आहे. बेळगाव येथील जीआयटी महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. आणखी एक विद्यार्थी मुडलगी येथील …

Read More »

श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  खानापूर : श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे शनिवार दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन आणि औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. खानापूर येथील शासकीय दवाखाना तसेच जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात असून या आरोग्य शिबीराचे संयोजक आरोग्य …

Read More »