बंगळूर : खानापूर तालुक्यात नवीन बस स्थानक व बस आगाराची निर्मिती होत आहे. पण खानापूर तालुक्यात ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पूरक बसेस नाहीत, शिवाय तालुक्यातील प्रमुख गावात उपबस स्थानकाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गुरुवारी बेंगलोर निवासी कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी …
Read More »चिगुळे गावात दोन गटात हाणामारी; 25 जण जखमी
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील चिगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण जखमी झाले आहेत. काहीजण किरकोळ जखमी आहेत तर काहीं गंभीर जखमीना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका व्यक्तींवर केएलईमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर फिर्याद दाखल करण्यात आली …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सी एस कदम सर होते. उपस्थितांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. या निमित्ताने प्रास्ताविकेतून श्रीमती वर्षा चौगुले टीचर यांनी पर्यावरण प्रदूषण व प्लास्टिकचा होणारा वापर यावर …
Read More »खैरवाड येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे जंगी स्वागत
खानापूर : खानापूर तालुक्यातील खैरवाड येथे नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे खानापुरात जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी कोल्हापूर येथून सदर मूर्ती खानापुरात येताच ढोल ताशाच्या निनादात जांबोटी क्रॉस बसवेश्वर सर्कल पासून सवाद्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने विषभूषाधारक युवा कार्यकर्ते महिला …
Read More »अन्यायी वीज बिल दरवाढसंदर्भात भाजपच्या वतीने खानापूर तहसीलदाराना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार येताच सर्व सामान्य जनतेवर अन्यायी वीज बिलात दुप्पटीने वाढ करून काँग्रेस सरकारने आपले खरे दात दाखवुन जनतेची फसवणूक केली आहे. यासंदर्भात खानापूर तालुका भाजपच्या वतीने खानापूर तहसील कार्यालयात जोरदार निदर्शने करून तहसीलदाराना निवेदन सादर केले. यावेळी ऍड. आकाश अथणीकर यांनी निवेदनाचा हेतू …
Read More »खानापूर शिवस्मारकात शिवाजी महाराजांचा उद्या राज्यभिषेक सोहळा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उद्या मंगळवार दि. 6 रोजी साजरा करण्यात येणार आहे. खानापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही तिथी प्रमाणे होत आहे. यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक सोहळा मंगळवारी दि. 6 रोजी होत …
Read More »१९ रोजी खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण
खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपुष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण येत्या १९ जुन रोजी जाहीर होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी दि. १९ रोजी होणाऱ्या …
Read More »गोधोळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी ग्राम पंचायतीत मनरेगा व रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गोधोळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी काल तालुका पंचायतीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर EO, खानापूरचे तहसीलदार, जिल्हाधिकारी बेळगाव, तसेच जिल्हा परिषदेचे चीफ सेक्रेटरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुका पंचायतीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसरना निवेदन देताना भाजपा …
Read More »गोल्याळी अपघातातील युवकाचा मृत्यू ; दोन युवतीना आले अपंगत्व, एकजण सुखरूप
खानापूर : बिडी आळणावर या राजमार्गावरील गोल्याळी वन खात्याच्या चेक पोस्ट नाक्यापासून जवळ असलेल्या वळणावर दुचाकीची बसला धडक बसून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा दुपारी उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव यल्लाप्पा प्रकाश हुन्नूर (वय 25) असे आहे. तर उर्वरित तिघांच्यावर उपचार सुरू असून यापैकी पल्लवी मारुती …
Read More »बुधवारी खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची हुलकावणी, शेतकऱ्यांतून नाराजी
खानापूर : गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची हुलकावणीच होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी पसरली आहे. बुधवारी सकाळी पासुनच उष्णता वाढली होती. दुपारी वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. संध्याकाळी जोराचा वारा सुटला. आकाशात काळे ढग दिसत मात्र काही वेळातच जोराचा वारा सुटला तसे ढग बघता बघता …
Read More »