Friday , November 22 2024
Breaking News

निपाणी

कार्यकर्त्यांनाच पक्ष मानून निवडणूक रिंगणात : उत्तम पाटील

बोरगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद   निपाणी (वार्ता) : कोणत्याही कार्यात पारदर्शकता असनणे ही सहकारत्न रावसाहेब पाटील यांची शिकवण आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा. कोणत्याही पदाची अपेक्षा करू नका, अशी शिकवण आहे. त्या अनुषंगाने आमचे काम सुरू असून सामान्य जनतेची सेवा हेच अरिहंत  कुटुंबीयांची शिकवण असल्याचे मत …

Read More »

‘माझी बोली माझी कथा’ कथासंग्रहात; निपाणीतील कन्येच्या ‘झटाझोंब्या’चा समावेश

निपाणी (वार्ता) : डॉ. मोनिका ठक्कर यांच्या ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात ‘माझी बोली माझी कथा’ या ५७ बोलीतील कथासंग्रहात निपाणीतील कन्या सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंबी’ कथेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निपाणीतील साहित्य …

Read More »

आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा

मंडल पोलिस निरीक्षक पाटील : निपाणीत जवान, पोलिसांचे पथसंचलन निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणूक जवळ आली असून या काळात मतदारांना विविध अमिष दाखवण्यासह दमदाटीचे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन मंडल पोलिस निरीक्षक एस सी पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या …

Read More »

कुर्ली गावाने कायम काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान दिले : माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे प्रतिपादन

  कुर्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : कुर्ली गावाला स्वातंत्र सैनिकांचा इतिहास आहे. कुर्ली गावाने कायम काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान दिले आहे. आपल्यापासून काही लोक दुरावले असतील पण कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षासोबतच आहेत. येत्या निवडणुकीत मी स्वतः कुर्ली गावात लक्ष घालून पक्षाला सर्वांधिक मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी ऊर्जामंत्री वीरकुमार …

Read More »

कोगनोळी टोलवर ७ लाख ५० हजार जप्त

  पोलिसांची कारवाई : एक जण ताब्यात कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये ७ लाख ५० हजार रुपये सापडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी …

Read More »

हुतात्मा स्मारकासाठी जागा न मिळाल्यास आंदोलन

प्रा. सुभाष जोशी : तंबाखू आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : तंबाखू आंदोलनात १२ शेतकरी हुतात्मा झाले आहेत. त्यांचे बलिदान येणाऱ्या पिढीला समजण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी स्मारक उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला अजूनही मूर्त स्वरूप प्राप्त झालेले नाही. सध्या आचारसंहिता असल्याने पुढील महिन्यात नगरपालिकेत जागेची मागणी करू. यावेळी जागा न …

Read More »

कार्यकर्तेच मला विजयी करतील : काकासाहेब पाटील

निपाणी (वार्ता) : सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली प्रकृती साथ देईल की नाही या संभ्रमावस्थेमुळे आपण उमेदवारी नाकारली होती. काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर केली असून आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची …

Read More »

कोगनोळी टोलवर १ कोटी ५० लाख जप्त

पोलिसांची कारवाई : एक ताब्यात कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये १ कोटी ५० लाख रुपये सापडल्याची घटना बुधवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. अशोक गंगाधरशेठ या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …

Read More »

सीमा नाक्यावर २ हजार वाहनांची तपासणी

विधानसभा निवडणुक : बंदोबस्त कडक कोगनोळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक केला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची या ठिकाणी कसून चौकशी करून व तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये या ठिकाणी रोख रक्कम व …

Read More »

ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा : प. पू प्राणलिंग स्वामीजी

  निपपाणी : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आणि निपाणी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून तहसिलदर प्रविण कारंडे यांना निवेदन देण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाअध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी यावेळी म्हणाले की, ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर जो हुबळी येथे अज्ञान समाज‌कंटकानी जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा आम्ही विश्व हिंदू …

Read More »