Sunday , July 26 2026
Breaking News

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love

 

गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक
निपाणी (वार्ता) : राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर पंचहमी गॅरंटीमधून सर्वच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत आहे. ही योजना निरंतरपणे सुरू राहणार असून विरोधकांच्या अफवावर लाभार्थी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये. ही योजना आणखीन प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील सर्वच घरासमोर अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या किंवा गॅरंटी योजना कमिटीच्या सदस्यांना घेऊन योजनेबाबतची एक रांगोळी रेखाटून त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ तालुका गॅरंटी कमिटीला अथवा कमिटीच्या व्हाट्सअप ग्रुपला पाठवणे आवश्यक आहे. याशिवाय जनन मृत्यूची नोंद तात्काळ करण्याचे आवाहन तालुका गॅरंटी योजना कमिटीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले. येथील तालुका पंचायत कार्यालयात सोमवारी (ता.२) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
रमेश जाधव म्हणाले, सध्या तलाठी ऐवजी ग्रामपंचायत कार्यालयात जनन नोंदणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित पिडिओ अथवा सेक्रेटरीकडे या नोंदी केल्या पाहिजेत. अनेक गावातील रस्त्याकडे ला विहिरीवर ओढे असून त्याचा धोका प्रवाशांना होतो. त्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. अनेक गावांमध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी निवारा शेड उपलब्ध नाहीत. त्याबाबतही कार्यवाही करावी. काही स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना कमी धान्याचा पुरवठा होत असून त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी अभिजीत गायकवाड यांना करण्यात आले.
शिवापुरवाडी मधील जडगे मळा, कुन्नूर परिसरात शेती पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपांना वीज पुरवठा कमी होत आहे. त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याची सूचना संबंधित हस्कॉम अधिकाऱ्यांना करण्यात आली. कोहली मधील भिवाजी मळ्यातील वस्तीमध्ये शेती साठी असलेल्या ट्रान्सफार्मरवरून घरांना वीजपुरवठा सुरू आहे. तो बंद करून घरासाठी स्वतंत्र वीज कनेक्शन देण्याची मागणी कमिटी सदस्य सचिन खोत यांनी केली. कुन्नूर, मांगुर आणि कोगनोळी येथील अनेक शेतकऱ्यांनी वीस वर्षांपूर्वी वीस हजार रुपये भरून शेती पाण्याचे कनेक्शन ट्रान्सफार्मर व खांब बसविले आहेत. पण शासनाकडून आता त्याची बिले दिली जात आहेत. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी योजना कमिटी सदस्यांनी केली. याशिवाय महिला व बालकल्याण विभाग व इतर विभागाच्या तक्रारी मांडण्यात आल्या.
बैठकीस तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, महिला व बालकल्याण अधिकारी निर्मला कुरबेट, योजना कमिटी सदस्य प्रतिक शहा, प्रकाश पाटील, जितेंद्र चेंडके, यासीन मनेर अशोक लाखे, रवी शास्त्री, जिवन थोरबोले यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *