उपनिरीक्षक शिवराज नायकवडी : मध्यवर्ती रिक्षा संघटनेतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : सध्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार संबंधित क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे त्यांना पाठबळ दिल्यास ते विद्यार्थी निश्चित ध्येय गाठू शकतात, असे मत ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी व्यक्त केले. उत्तर कर्नाटक रिक्षा चालक-मालक …
Read More »विविध रंगी, नक्षीच्या राख्यांनी निपाणी बाजारपेठ सजली
१० ते २० टक्क्यांनी राख्या महागल्या निपाणी (वार्ता) : बहीण-भावांचे नाते अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण २ दिवसांवर येऊन ठेपल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठेत विविध रंग आणि नक्षीच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. विविध रंगांच्या सुती धाग्यापासून या राख्या बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध आकार आणि डिझाईनचे मनी, …
Read More »दूधगंगेतून इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध
कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांचा सहभाग; आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्धार निपाणी (वार्ता) : दूधगंगा बचाव कृती समितीच्याच्या वतीने कोल्हापूर येथील शासकीय विश्रागृहात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील नेत्यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यामध्ये कर्नाटक सीमा भागातील नेते मंडळीसह शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास सुळकुड योजनेतून पाणी देण्यास विरोध दर्शवला. शिवाय …
Read More »युवकाच्या आत्महत्येप्रकरणी ५ जणांवर गुन्हा
निपाणी (वार्ता) : येथील दलाल पेठ येथे केशव किरण शिंदे (वय २५) (रा. जत्राट वेस, ढोर गल्ली) या युवकाने भाडोत्री व्यवसायाच्या ठिकाणी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान या आत्महत्या प्रकरणी मयत केशव यांचे वडील किरण शिंदे यांनी केशवच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. …
Read More »निपाणी हालशुगर निवडणुकीचे बिगुल वाजले
१६ सप्टेंबरला मतदानासह मतमोजणी; निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष निपाणी (वार्ता) : येथील श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला नुकताच मल्टीस्टेटचा दर्जा प्राप्त झाला आहे. बंद पडण्याच्या अवस्थेत आलेला हा कारखाना खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या पाठबळातून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली …
Read More »नाशिक महामेळाव्यात अक्कोळच्या डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा सन्मान
निपाणी (वार्ता) : श्री.सद्गुरू स्वामी महाराज यांच्या ५१ व्या पुरुषोत्तम मास त्रैमासिक पुण्यतिथी उत्सवानिमित्त नाशिक पंतभक्त परिवारातर्फे नाशिक येथे महामेळावा व बोधपीठ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा श्रीपंत बोधपीठाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत पंतबाळेकुंद्री (ठाणे) यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान …
Read More »‘व्हीएसएम’च्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील व्ही.एस.एम. शिक्षण संस्थेच्या जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीआरसी पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवून त्यांची तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २०० मीटर धावण्यामध्ये अरुण भोंगाळे, ६०० मीटर धावण्यात अमर महेश गुरव, १०० मीटर धावण्यात गौरव अमर माळवे यांनी यश मिळवले. थाळी …
Read More »निपाणीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दलाल पेठ येथे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. केशव किरण शिंदे (वय २४ रा. जत्राटवेस, निपाणी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी, केशव हा आपल्या वडिलांसोबत हँडग्लोज विक्रीचा व्यवसाय करत होता. गणेश …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉमवर मंगळवारी मोर्चा
निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग १६ तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्टसर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी (२९) मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. …
Read More »दूधगंगा नदीवरील विद्युत मोटारींची चोरी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता. 25 रोजी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी दूधगंगा नदी काठावर बसवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री अज्ञात चोट्यांच्या कडून 20 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta