Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

युवाशक्तीच घाणेरड्या राजकारणाला मुठमाती देईल : युवा नेते उत्तम पाटील

निपाणीत रविवारी युवक मेळाव्याचे आयोजन निपाणी(वार्ता): आजचे तरुण हे उद्याचे भविष्य आणि देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. मी आपल्यातील एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. तरीही अडचणी आणल्या जात आहेत. अशा या घाणेरड्या राजकारणाला ही युवाशक्तीच क्रांती करून मूठमाती देईल, असा ठाम विश्वास …

Read More »

कोगनोळीत ईव्हीएम मशिनची जनजागृती

  कोगनोळी : येथील ग्राम पंचायत कार्यालयात सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मतदान मशिनबद्दल जनजागृती केली. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा वनिता खोत तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते. उज्वल शेवाळे यांनी स्वागत तर प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रास्ताविक …

Read More »

यरनाळ गावच्या विकासासाठी कटिबद्ध

युवा नेते उत्तम पाटील : युवा शक्तीतर्फे हळदी-कुंकू  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि यरनाळ येथील उत्तम पाटील युवा शक्ती संघाच्या संयुक्त विद्यमाने यरनाळ येथे हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी  माजी आमदार प्रा. सुभाष जोशी तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, धनश्री …

Read More »

सुरळीत पाण्यासाठी निपाणी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा

  पाणी बिलावर विरोधीगट, नागरिक आक्रमक : पालिका प्रशासन धारेवर निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे अपूर्ण काम, अनियमित पाणीपुरवठा, वाढीव पाणी बिल यासह विविध मागण्यांसाठी शहर व उपनगरातील नागरिकांनी विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. येथील बेळगाव नाक्यावरील बॅरिस्टर नाथ …

Read More »

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात : उत्तम पाटील

हुन्नरगीत हळदी – कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते मंडळी विकास कामे केल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात अनेक समस्यांना मतदारसंघातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण सत्तेत नसतानाही अरिहंत उद्योग समूहातून समाज हिताची कामे केली आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात आहोत. …

Read More »

घंटा वाजवत आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासनाची भेट

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात अजूनही 24 तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याशिवाय अनेक प्रभागात चार ते सहा दिवसातून एकदा पाणी येत आहे. याशिवाय पाणी येण्यापूर्वी काही वेळ हवा येत असल्याने मीटर फिरून त्याचे बीलही नागरिकांना दिले जात आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेवर मोर्चा काढून बऱ्याचदा निवेदन दिले होते. …

Read More »

राजगड सज्जनगड मोहिम पूर्ण; मावळा ग्रुपची राजगडला भेट

निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या २५० सदस्यांनी राजगडला भेट देऊन या किल्ल्याची माहिती जाणून घेतली. ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी प्रतापगड व रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली होती. यावर्षी सज्जनगड व राजगड मोहीम पूर्ण करण्यात आली. राजगडावर सचिन खोपडे यांनी या गडाची …

Read More »

लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

    विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःचा शोध घेउन आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा विकास करावा. प्रत्येक विद्यार्थ्या मध्ये कोणते ना कोणते कौष्यले असतेच तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास करुन जीवनामध्ये एक चांगला माणूस बना, असे विचार नवलीहाल येथील सरकारी मद्यामिक विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक संतोष माने यांनी व्यक्त केले. मनगुत्ती …

Read More »

राजकीय मंडळीकडून विकासकामांत अडथळे

उत्तम पाटील : बेनाडीत हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून गेल्या पंचवीस वर्षापासून अरिहंत उद्योग समूहातर्फे समाजकार्य केले जात आहे. त्यामध्ये महिलांना रोजगार, पुरुषांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना मदत, आरोग्य सुविधा,  शिष्यवृत्ती यासह अनेक उपक्रमांचा समावेश आहे. राजकीय सत्ता नसतानाही निरंतरपणे कार्यरत आहोत. पण आता राजकीय मंडळीकडून …

Read More »

संभाजीनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत डॉन फायटर विजेता

  निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालयात शेजारील न्यू संभाजीनगरमध्ये प्रीमियर लीग हाफपिच नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 मधील सीजन-2 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉन फायटर संघाने विजेतेपद पटकवले. या स्पर्धेत वेद फायटर्स संघ, ब्ल्यू आर्मी संघ यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान …

Read More »