Saturday , December 13 2025
Breaking News

निपाणी

अकोळ शर्यतीत वाघमोडे यांची बैलगाडी प्रथम

बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात; विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अकोळ येथील बाळूमामा देवस्थान भंडारा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत संदीप वाघमोडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये, निशान व ढाल असे बक्षीस मिळविले. विक्रम नांदेकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे तर संदीप पाटील यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांकाचे ७००० …

Read More »

अंडी घोटाळ्यामुळे महत्त्वाचे पद गेले

काकासाहेब पाटील : निपाणीत गॅरंटी कार्ड वितरण  निपाणी : आपल्या आमदार कीच्या काळात काळम्मावाडी पाण्याचा करार, वेदगंगा नदीपासून पाइपलाइन, खरी कॉर्नर येथे ब्रिज, निपाणी तालुका निर्मिती, निपाणी मतदारसंघ पुनरुज्जीवन अशी शाश्वत कामे केली आहेत. निपाणी रेल्वेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून सर्वेक्षण करेपर्यंत पाठपुरावा केला. पण त्यानंतर मंत्री आणि खासदार झालेल्यांनी या …

Read More »

कर्नाटक कालव्यातील गाळ काढण्याची मागणी

  घाणीचे साम्राज : शेतकरी आक्रमक कोगनोळी : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी येत असल्याने कर्नाटक सीमा भागातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यासाठी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील म्हाकवे गावापासून कर्नाटक हद्दीतील कालव्यातील गाळ व स्वच्छता …

Read More »

निपाणी येथील शर्यतीत शिवानंद भोसलेंची घोडागाडी प्रथम महाशिवरात्रीनिमित्त आयोजन 

निपाणी (वार्ता) : महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता.२३) सायंकाळी आयोजित जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीच्या शिवानंद भोसले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीमध्ये यांच्या यमगरणीच्या रामचंद्र मोरे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये बक्षीस पटकाविले. तर …

Read More »

हंचिनाळ येथे रयत संघटनेच्या शाखेचे उदघाटन

  कोगनोळी : हंचिनाळ (तालुका निपाणी) येथे रयत  संघटनेच्या ४३ व्या शाखेचे उदघाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते झाले. हंचिनाळ शाखाध्यक्ष मोहन नलवडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोलताना राजू पोवार म्हणाले, आम्ही गेली २० वर्षे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे याद्वारे अहोरात्र झटत आहोत. मात्र देशातील व राज्यातील सत्ताधारी …

Read More »

महादेवाच्या पालखीची मिरवणूकीने समाधी मठाला भेट महाप्रसादाचे वाटप

निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचा रथोत्सव मंगळवारी (ता.२१) पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.२२) सकाळी येथील महादेव मंदिरापासून उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाधी मठात उत्सव मूर्तीची पूजा करून महाप्रसादाचे वाटप झाले. प्रारंभी महादेव मंदिराजवळ महोत्सव कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस पुष्पहार …

Read More »

‘हर, हर महादेवा’च्या गजरात निपाणीत रथोत्सव

हजारो भाविकांची उपस्थिती : रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता निपाणी (वार्ता) : करडी ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांचा आकाशाला गवसणी घालणारा आवाज आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.२१) झाला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रस्ते फुलले होते. दुपारी ३वाजता रथात बसण्यासाठी सवाल …

Read More »

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील

धनश्री पाटील : तवंदी येथे फलक अनावरण, हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : महिला या प्रगत समाजात पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे अग्रेसर आहेत. भारतीय संवीधा नुसार महीला ही एक शिपाई ते राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. ही बाब बोरगांव येथील अरिहंत उद्योग समूह लक्षात घेऊन महिलांच्या कला गुणांना वाव मिळवून …

Read More »

सोनाळकर कुटुंबीयांनी केली वैचारिक शिवजयंती

शहरात प्रथमच अनोखा उपक्रम : शहरवासीयातून कौतुक  निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून काम केले आहे. स्वराज्य कसे स्थापन करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीसह बाल मनावर लोकापर्यंत पोहोचण्या करिता केलेले कार्य महत्त्वाच्या आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Read More »

आप्पाचीवाडी येथे शिवजयंती साजरी

निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी येथील श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार उपस्थित होते. आप्पाचीवाडी येथील युवकांनी रायगड येथून आणलेल्या शिव ज्योतीचे स्वागत करण्यात आले. मदास कोकणे यांनी स्वागत केले. त्यावेळी मान्यवरांनी हालसिद्ध नाथांचे दर्शन शिवाजी महाराजांच्या पाळण्याचे पूजन …

Read More »