माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत काँग्रेसचा युवा मेळावा निपाणी (वार्ता) : काँग्रेस सत्तेमध्ये असताना निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाश्वत विकासाची कामे केली आहेत. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधा पुरवण्याच्या नावाखाली नागरिकासह तरुणांना बोलवण्याचे काम करीत आहेत, असा घनाघाती आरोप माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. येथील मराठा मंडळ …
Read More »हणबरवाडी ग्रामस्थांचा प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा
पाटील मळ्याजवळ पुलाची मागणी : मागणी न मान्य झाल्यास रस्ता काम बंद कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना येणे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. व महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाडी-वस्तीवरील विद्यार्थी व नागरिकांना महामार्गावरून गावाकडे व गावातून पुन्हा महामार्गावरून निपाणी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठी …
Read More »कुन्नूरमध्ये रविवारपासून ‘अरिहंत चषक’ शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा
उत्तम पाटील : आंतरराष्ट्रीय १६ संघ सहभागी निपाणी (वार्ता): कुन्नूर (ता. निपाणी) येथील श्री. दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लबतर्फे कुन्नूर येथे अरिहंत चषक शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२९) दुपारी २ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघ सहभागी झाले आहेत. सोमवारी (ता.३०) रात्री अंतिम सामना …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिलेबी, हार, गजराचे स्टॉल
२०० रुपये किलो जिलेबी :१०० रुपयापुढे हार निपाणी (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात जिलेबी चे स्टॉल, फुलांचे हार आणि गजर यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी बुधवारी (ता.२५) सायंकाळी गर्दी झाली होती. यावर्षी जिलेबी प्रति किलो २०० रुपये, फुलांचे हार १०० रुपयावर तर गजरे २५ रुपयाच्या पुढे विक्री केली जात होती. …
Read More »पुरुष विभागात पुणे, महिला विभागात केरळ संघ अरिहंत चषकाचा मानकरी
पुरुष 40 तर महिलांचे 10 संघ सहभागी : प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बालवीर स्पोर्ट्स क्लब आयोजित अरिहंत उद्योग समूह व उत्तम पाटील युवाशक्ती यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम सामन्यात पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळवून अरिहंत चषक, सुवर्णपदक आणि रोख 25 हजाराचे बक्षीस मिळविले. तर …
Read More »निपाणीतील क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ विजेता
सांगली संघ उप विजेता : १४ वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् ऍण्ड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (ता. २३) अटीतटीचा झाला. त्यामध्ये कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम संघाने विजेतेपद पटकावले. तर सांगलीच्या अनिल …
Read More »निपाणीतील शिबीरात ५१ जणांचे रक्तदान
श्रीराम सेनेतर्फे आयोजन : रक्तदात्यांना हेल्मेट वितरण निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना कर्नाटक यांच्यातर्फे संस्थापक प्रमोद मुतालिक यांचा जन्मदिवस आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त येथील संत नामदेव मंदिरात चिकोडीतील आदर्श ब्लड बँकेच्या सहकार्याने सोमवारी (ता.२३) रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ५१ रक्तदात्यांनी रक्तदान …
Read More »संगणक उताऱ्यासाठी ग्रामस्थांच्या फेऱ्या
पन्नासहून अधिक अर्ज : ग्रामस्थांची कुचंबणा कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारे संगणक उतारे गेल्या चार पाच महिन्यापासून वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीला फेऱ्या मारण्याचे काम सुरू आहे. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अनेक नागरिकांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी बँक लोन व अन्य …
Read More »निपाणीत ‘अरिहंत’ चषक व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ
राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार (ता.२२ ते बुधवार (ता.२४ ) अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर महिला आणि पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे …
Read More »हणबरवाडी पिण्याचे पाणी सुरळीत देण्याची ग्रामस्थांची मागणी
कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे गेल्या चार-पाच दिवसापासून पिण्याचे पाणी आले नसल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना सुरळीत पाणी देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना विजय खोत म्हणाले, हणबरवाडी येथील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतच्या सदस्यांना व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta